16 वर्षीय मुलावर माशाचा हल्ला, गळ्यातून आरपार गेला मासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 16 वर्षांच्या मुलावर एका माशानं असा हल्ला केला की, त्याच्या गळ्याला मोठं होल पडलं. माशाचा हल्ला एवढा घातक होता की, काही मिनिटांतच त्या मुलाचा जीव जाऊ शकत होता. ही घटना इंडोनिशियातील आहे. प्लाईंग निड्लफिश असं या माशाचं नाव आहे. मोहम्मद इदुल असं त्या मुलाचं नाव आहे. आपल्या पालकांसोबत तो सुलावेसी प्रोव्हिन्समध्ये मासेमारी करत होता.

लड़के की गर्दन के आरपार हो गई मछली, दिल दहलाने वाली PHOTOS
मासेमारी करताना अचानक उडत आलेल्या एका माशानं इदुलच्या गळ्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी घडली आहे. या हल्ल्यानंतर इदुलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर मुलाच्या गळ्याची सर्जरी करण्यात आली. इदुलच्या गळ्यातून आरपार झालेल्या माशाचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

इदुलच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. सध्या तो रुग्णालयातच आहे. सोमवारी डॉक्टरांच्या टीमनं 2 तासाचं ऑपरेशन करत इदुलच्या गळ्याची सर्जरी केली. इदुलच्या गळ्याला मोठं होल झाल्याचंही डॉक्टर आरिफ यांनी सांगितलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –