फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली

चंडीगड : वृत्त संस्था – भारताचे महान धावपटू आणि फ्लाइंग शिख Flying sikh म्हणून ओळखले जाणारे मिल्खासिंग Milkha singh (वय ९१) यांचे येथील एका रुग्णालयात शुक्रवारी रात्री प्राण ज्योत मालवली. कोविड १९ मधून बरे झाल्यानंतरही गेले काही दिवस त्यांच्यावर येथील पीजीआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पाच दिवसांपूर्वीच कोविड १९ मुळे त्यांच्या पत्नी निर्मल कौर (वय ८५) यांचे निधन झाले होते. त्यापाठापोठ गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. ते स्वत: आयसीयुमध्ये असल्याने आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारातही ते सहभागी होऊ शकले नव्हते.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

निर्मल कौर यांच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांचे कुटुंबिय बाहेर आलेले नसतानाच आणखी एक मिल्खा सिंग यांच्या कुटुंबियांना बसला आहे. याबाबत पीजीआयएईआर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मिल्खासिंग यांना ३ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १३ जूनपर्यंत त्यांच्यावर कोरोनाचा उपचार सुरु होता. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करावे लागले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यातून ते बाहेर येऊ शकले नाही. रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले.

मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी गोपालपुरा (सध्या पाकिस्तान) येथे झाला. १९५८ आणि १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदाक मिळविणारे ते एकमेव भारतीय धावपटू आहेत. १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये ते ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांचे वैयक्तिक ब्राँझपदक हुकले होते. त्यात त्यांनी ४५.६ सेकंदांची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्यांच्या चरित्रावर २०१३ मध्ये ‘भाग मिल्खा’ हा चित्रपट खूप गाजला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, आम्ही एका महान खेळाडुला गमावले आहे. त त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या ह्दयात वेगळे स्थान निर्माण केले होते.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : flying sikh milkha singh dies 91 due post covid 19

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित