इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये त्रुटी! इन्फोसिस आणि नंदन नीलकणी यांच्यावर भडकल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने प्राप्तीकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल (E filing portal) सोमवारी रात्री 8.45 वाजता हे सांगत लाँच केले की, हे पहिल्यापेक्षा चांगले केले आहे. यामुळे टॅक्सपेयर्ससाठी ई-फायलिंग सोपे होईल. मात्र, झाले उलटे आणि नवीन वेबसाइटमध्ये त्रुटीच्या तक्रारी येऊ लागल्या. यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलकणी यांच्यावर भडकल्या.

आशा आहे की इन्फोसिस, नीलेकणी निराश करणार नाहीत

अर्थमंत्री सीतारमण यांनी इन्फोसिस आणि नीलकणी यांना टॅग करत ट्विट केले की, करदात्यांच्या वापरात सहजता आपली प्राथमिकता असावी.
आशा आहे की इन्फोसिस आणि नंदन नीलकणी सेवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत टॅक्सपेयर्सना निराश करणार नाहीत.
डिझाइन पोर्टल नवीन करणे आणि देखरेखीची जबाबदारी इन्फोसिस ला दिली गेली आहे.
अगोदर ई-फायलिंग वेबसाइटचा अ‍ॅड्रेस incometaxindiaefiling.gov.in होता, जो आता बदलून incometax.gov.in झाला  आहे.
ई-फायलिंग पोर्टल (E-filing portal) 7 जून 2021 च्या सकाळी लाँच होणार होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते रात्री 8.45 वाजता लाँच केले.
यानंतर सुद्धा यामध्ये गडबड असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत.

नवीन पोर्टलमध्ये टॅक्सपेयर्सला मिळतील या सुविधा

* वेबसाइट जास्त यूजर फ्रेंडली असेल, ज्यामुळे आयटीआर फाइल करणे सोपे होईल आणि रिफंड सुद्धा लवकर मिळेल.

*पोर्टलवर अपलोड आणि पेंडिंग पडलेली कामे एकाचवेळी दिसतील.
एखाद्या टॅक्सपेयर्सचे काम रखडले असेल तर त्याची माहिती सुद्धा येथे मिळेल.
म्हणजे याद्वारे आयटीआर फाईल करणे, ते रिव्ह्यू करणे आणि अ‍ॅक्शन घेणे सोपे होईल.

* मोफत मिळणारे आयटीआर प्रीपरेशन सॉफ्टवेयर असेल ज्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन एकाचवेळी प्राप्त केले जाऊ शकते.

* जर काही प्रश्न असेल तर तो मांडू शकता.
आयटीआरशी संबंधीत कोणतीही समस्या असेल तरी त्याची क्वेरी करू शकता.

* कोणत्याही टॅक्सच्या माहितीशिवाय कुणीही टॅक्सपेयर कमीत कमी डेटा नोंदवून सहजपणे ई-फायलिंग करू शकतो.

* फायलिंगशी संबंधीत कोणतीही अडचण आल्यास, त्याची माहिती फोनवर घेऊ शकता.

टॅक्सशी संबंधीत ‘एफएक्यू’, ट्यूटोरियल, व्हिडिओ आणि चॅटबोटची सुविधा घेऊ शकता.

* डेस्कटॉप पोर्टलच्या सर्व आवश्यक सुविधा मोबाइल अ‍ॅपवर सुद्धा उपलब्ध आहेत.

* एक नवीन टॅक्स पेमेंट सिस्टम आणली आहे पोर्टलमध्ये , ज्याद्वारे पैसे भरण्याचे अनेक पर्याय आहेत.
यामध्ये नेट बँकिंग, यूपीआय, आरटीजीएस, एनईएफटीचा समावेश आहे.

पर्यावरण दिनानिमित्त लावली चक्क गांजाची झाडं; फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास

Web Title : fm nirmala sitharaman flaws in the new e filing portal strict instructions given to infosys and nandan nilekani