FM Nirmala Sitharaman | कोट्यवधी शेतकऱ्यांचे दुप्पट होईल उत्पन्न; बजेटमध्ये अर्थमंत्री करणार “ही” घोषणा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – FM Nirmala Sitharaman | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच सबसिडीची सुविधाही दिली जात आहे. मात्र, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) एक विशेष घोषणा करू शकतात, ज्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते (Budget 2023).

 

उठवली जाऊ शकते निर्यातबंदी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३ च्या अर्थसंकल्पात गव्हासारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवू शकतात. यासोबतच ज्या कृषी उत्पादनांची एमएसपी कमी आहे, त्यांची आयातही बंद केली जाऊ शकते. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

 

तेलबियांवर लक्ष केंद्रित केल्यास वाढू शकते शेतकऱ्यांचे उत्पन्न
शेतकरी संघटनांची मागणी आहे की, सरकारनेही तेलबियांच्या उत्पादनावर भर द्यावा, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. याशिवाय सोयाबीन, मोहरी, भुईमूग, सूर्यफुलाच्या उत्पादनावरही भर द्यावा. यामुळे पाम तेलाचा वापर कमी होण्यासही मदत होईल. यावेळी सरकारने शेतकरी संघटनांच्या या मागणीकडे लक्ष देऊन ती मान्य केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकेल.

ठोस पावले उचलण्याची गरज
भारत कृषक समाजाच्या अध्यक्षांनी अर्थमंत्र्यांना सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २०२३
च्या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. यासोबतच मानव संसाधनाच्या विकासावरही भर द्यायला हवा.

 

राज्य सरकारांनीही केले पाहिजे प्रेरित
केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांनीही यासाठी प्रेरित व्हायला हवे.
कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणा‍ऱ्या राज्यांना अधिक गुंतवणूक रक्कम देऊन कृषी क्षेत्राला पुढे नेले जाऊ शकते.

 

Web Title :- FM Nirmala Sitharaman | in budget 2023 fm nirmala sitharaman may take big decision on farmers income

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज