‘कोरोना’ विषाणूचा ‘इम्पॅक्ट’ ! अर्थमंत्र्यांनी सांगितलं – ‘औषधांच्या ‘किंमती’ वाढल्या, घाबरू नका सर्व काही ‘कंट्रोल’मध्ये’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणू (Corona Virus) च्या आपत्तीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) होणाऱ्या नुकसानीवर मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उद्योग तज्ञांची भेट घेतली. अर्थमंत्री म्हणाल्या की लवकरच केंद्र सरकार याबाबत आवश्यक ती पावले उचलणार आहे. फार्मा, रसायन आणि सौर उपकरणे उद्योगाने कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था आणि बाजारावर परिणाम घडत असल्याचे सांगितले. अर्थमंत्री म्हणाल्या की जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने चिंता करण्याची काहीही गरज नाही.

औषधांसाठी लागणार कच्चा माल विमानातून आणण्याची मागणी
या बैठकीत फार्मा कंपन्यांनी अर्थमंत्र्यांना विनंती केली की एपीआय (Active Pharmaceuticals Ingredient) च्या कच्च्या मालास विमानाने भारतात आणला जावा. जर सरकारने हे केले तर येत्या काही दिवसांत औषधांची निर्मिती व उपलब्धतेवर मात करण्यात येईल. औषधे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाला एपीआय (API) म्हणतात.

अर्थमंत्री म्हणाल्या की बुधवारी त्या विविध मंत्रालयांच्या सचिवांशी बैठक घेतील आणि त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) सहकार्याने आवश्यक ती पावले उचलली जातील. त्या म्हणाल्या, ‘कच्च्या मालाच्या पुरवठ्यात काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे फार्मा, सौर आणि रसायन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.’

रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे
काही दिवसांपूर्वी चर्चेत होते की पॅरासिटामोलसह इतर अनेक औषधांच्या किंमती वाढत आहेत. या संदर्भात अर्थमंत्री म्हणाल्या की कोरोना विषाणूमुळे किंमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब नाही. तसेच त्यांनी स्पष्ट केले की हे सांगणे घाईचे होईल की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मेक इन इंडियावर परिणाम होत आहे. औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे त्या म्हणाल्या रुग्णालयात आवश्यक औषधांची कमतरता नाही. तथापि, मेडिकल इक्विटपमेंट बनवणाऱ्या उत्पादकांकडून अशी मागणी होती की निर्यातीवर बंदी घालावी.

७० टक्के पर्यंत महागले आवश्यक औषधे
कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या औषधांच्या किंमती वाढत आहेत. देशात पॅरासिटामोलच्या किंमतीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅझिथ्रोमाइसिन ((Azithromycin) देखील ७० टक्क्यांनी महाग झाले आहे. फार्मा कंपनी Zydus Cadila चे अध्यक्ष पंकज पटेल यांनी ही माहिती दिली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत औषधांचा पुरवठा दुरुस्त न केल्यास एप्रिल महिन्यात फार्मा उद्योगास औषधांची प्रचंड कमतरता भासू शकते, असे देखील पटेल यांनी स्पष्ट केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like