अर्थमंत्र्यांनी कांद्याबाबत दिली खुशखबरी ! सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किरकोळ महागाई जाहीर झाल्याच्या एका दिवसानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या व्यतिरिक्त अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, मुख्य आर्थिक सल्लागार आणि वित्त सचिव हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. अर्थमंत्र्यांनी सरकारने घेतलेल्या सुधारणांची व त्यांच्या परिणामांची माहिती दिली. कांद्याच्या किंमतींबद्दल त्या म्हणाल्या की आता काही ठिकाणी कांद्याचे दर खाली येत आहेत. तसेच अफगाणिस्तानातून कांदा आयात केल्याने देशात किंमती खाली येण्यास सुरवात झाली आहे. अफगाणिस्तानातून कांद्याची घाऊक किंमत प्रति किलो ४०-४५ रुपये आहे. देशांतर्गत कांद्याची किंमत प्रति किलो ६५-७५ रुपये आहे, तर किरकोळ किंमत प्रति किलो १०० रुपयांपेक्षा जास्त आहे.

कांद्याच्या किंमतींचा सातत्याने आढावा घेत आहे सरकार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, काही ठिकाणी कांद्याचे दर खाली येत आहेत. अजून तरी ते पूर्णपणे खाली आले नाहीत परंतु ते कमी नक्कीच होत आहेत. मंत्र्यांचा एक गट सतत या गोष्टीवर लक्ष ठेऊन असतो, जे दर १-२ दिवसांनी आढावा घेत असतात.

आयात केल्याने कांद्याच्या किमती कमी होत आहेत
अर्थमंत्री म्हणाल्या की कांदा हा भाजीपाला वर्गीय प्रकारात मोडत असल्याने फार लवकर खराब होण्याची शक्यता असते. यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे देशातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम कांदा उत्पादनामध्ये दिसून आला असून कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळेच सरकारने कांद्याची आयात केली आहे. त्यामुळे बाजारातील कांद्याचे भाव कमी होण्यास मदत होईल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/