FMCG Companies | सामान्य ग्राहकांना झटका ! महाग झाले AC आणि फ्रिज, 10 टक्केपर्यंत वाढतील वॉशिंग मशीनचे दर; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – FMCG Companies | नवीन वर्ष सुरू होताच महागाईने पुन्हा एकदा ग्राहकांना झटका दिला आहे. कच्चा माल आणि मालवाहतूक शुल्कात वाढ झाल्यामुळे, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी (FMCG Companies) एअर कंडिशनर (AC Price Hike) आणि रेफ्रिजरेटर्सच्या किमती (Refrigerator Price Hike) नवीन वर्षात वाढवल्या आहेत.

 

या महिन्यानंतर किंवा मार्च 2022 पर्यंत वॉशिंग मशीन 5-10 टक्क्यांनी महाग (Washing Machine Price) होऊ शकतात. पॅनासोनिक (Panasonic Company), एलजी (LG Company) आणि हायर (Haier Company) सह अनेक कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या आहेत. सोनी (Soni Company), हिताची (Hitachi Company), गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances)या तिमाहीच्या अखेरीस किमती वाढवू शकतात.

 

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SIEMA) नुसार, उद्योग जानेवारी-मार्च 2022 पर्यंत किंमती 5-7 टक्क्यांनी वाढवेल. असोसिएशनचे अध्यक्ष एरिक ब्रागांझा म्हणाले की, सणासुदीच्या हंगामामुळे उद्योगांनी दरवाढ पुढे ढकलली आहे.

 

आता दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकण्याशिवाय कारखानदारांकडे पर्याय नाही. Panasonic ने आधीच आपल्या AC च्या किमती 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

का वाढवल्या जात आहेत किमती?
हायर अप्लायन्सेस इंडियाचे सतीश एनएस (SATISH N.S – Senior Vice President – Haier Appliances India) म्हणाले, कमोडिटीच्या वाढत्या किमती, जागतिक मालवाहतुकीचे शुल्क आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे आम्ही रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन आणि एसी श्रेणींमध्ये आमच्या उत्पादनांच्या किमती 3 ते 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (FMCG Companies)

 

पॅनासोनिक इंडियाचे विभागीय संचालक (ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स) फुमियासू फुजीमोरी (Fumiyasu Fujimori, Divisional Director (Consumer Electronics), Panasonic India) म्हणाले की, एसीच्या किमतींमध्ये वाढ वस्तूंच्या किमती आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे होऊ शकते.

 

कच्च्या मालाच्या किंमतीने चिंता
दक्षिण कोरियातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने गृहोपयोगी वस्तूंच्या श्रेणीत किमती वाढवल्या आहेत. कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष (गृह उपकरणे आणि एसी व्यवसाय) दीपक बन्सल म्हणाले,
आम्ही नाविन्यपूर्ण उपायांद्वारे स्वतःच्या खर्चाची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.
आता व्यवसाय टिकून राहण्यासाठी दर वाढवणे गरजेचे आहे.

 

आता वाढ रोखणे कठीण
जॉन्सनचे नियंत्रण असलेल्या हिताची एअर कंडिशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरमीत सिंग म्हणाले की,
आता किमतीतील वाढ टाळता येणार नाही. कच्चा माल, कर आणि वाहतूक यासह उत्पादन खर्च वाढला आहे.

 

अशा परिस्थितीत, ब्रँड एप्रिलपर्यंत किंमती 10 टक्क्यांनी वाढवेल.
टप्प्याटप्प्याने एप्रिलपर्यंत किमान 8 ते 10 टक्के दरात वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- FMCG Companies | inflation ac fridge washing machine prices hike fmcg sector input cost rise AS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसचा खासगी फोटो लीक, जॅकलिन हात जोडून म्हणाली-‘मी कठीण काळातून जात आहे…’

Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा वाढणार पगार, जाणून घ्या – किती रूपयांची होईल वाढ