FMCG Price Increase | 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात रोजच्या वापरातील ‘या’ गोष्टींचे दर, कंपन्यांनी केली तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – FMCG Price Increase | देशातील सर्वसामान्य नागरिकांवर पुन्हा एकदा महागाईचा बोजा वाढणार आहे. देशातील सर्व मोठ्या FMCG कंपन्यांनी गहू आणि पाम तेल सारख्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढवण्याची तयारी केली आहे. जगात रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) गेल्या काही आठवड्यांपासून गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. (FMCG Price Increase)

 

एचयूएल आणि नेस्लेने वाढवले दर :
मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने Hindustan Unilever (HUL) ब्रू कॉफीच्या वेगवेगळ्या पॅकवर 1.5 ते 14 टक्के वाढ केली आहे. ताजमहालने चहाची (Taj Mahal Tea) किंमत 3.7 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांवर नेली आहे. त्या तुलनेत नेस्लेने (Nestle) देशातील सर्वात लोकप्रिय नूडल ब्रँड असलेल्या मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

 

देशात बिस्किटे बनवणारी कंपनी पार्लेचे (Parle Products Pvt. Ltd) वरिष्ठ उत्पादने प्रमुख मयंक शाह (Mayank Shah – Sr. Category Head – Parle Products Pvt. Ltd) यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही इंडस्ट्रीकडून किमतीत 10-15 टक्के वाढीची अपेक्षा करत आहोत. ते म्हणाले की दरात झपाट्याने चढ-उतार होत आहेत, त्यामुळे किमती किती वाढतील हे सांगणे कठीण आहे. (FMCG Price Increase)

ते पुढे म्हणाले की, पामतेलाचे दर 200 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेले होते, आता ते 180 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहेत. त्याचप्रमाणे, कच्च्या तेलाची किंमत देखील प्रति बॅरल 140 पर्यंत पोहोचली होती, जी आता प्रति बॅरल 100 च्या आसपास आली आहे. दरवाढीबाबत ते म्हणाले की, प्रत्येकजण 10 ते 15 टक्क्यांनी भाव वाढवत आहे, तर खर्च कितीतरी पटीने वाढला आहे.

 

डाबरचे सीएफओ अंकुश जैन (Dabur’s CFO Ankush Jain) म्हणाले की, महागाई उच्च पातळीवर राहण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
ते म्हणाले की, महागाईच्या दबावामुळे किमती वाढतील, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडेल आणि मागणीही कमी होईल.
आम्ही स्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि महागाईचा दबाव कमी करण्यासाठी किमती किंचित वाढवू.

 

Web Title :- FMCG Price Increase | inflation prices of fmcg items can increase by 10 percent

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

 

Multibagger Stock | 10 पैशांच्या जबरदस्त स्टॉकने गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले 57 कोटी रुपये, दिला 5 लाख टक्के भरभरून रिटर्न

 

Sanjay Raut | ‘द कश्मीर फाइल्स’मधील अनेक घटना खोट्या, संजय राऊतांचे मोठं विधान