लंडन : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील होणारी प्रगती आपण पाहतोच आहे. आता यावर्षी तंत्रज्ञानातील अनेक लक्षवेधख गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक थक्क करणाऱ्या घडामोडी तुम्हाला या वर्षात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. लवकरच आता असे स्मार्टफोन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जे अगदी सहज फोल्ड होऊ शकतील. आता काही आगळी वेगळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणेही यावर्षी तुमच्या भेटीला येणार आहेत. अनेक रोबोही तुम्हाला पाहायला मिळतील. लवकरच तुमच्या भेटीला क्लाऊट कम्प्युटींगही येणार आहे. आता 5 जी चा ही बोलबाला यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
आता अनेक स्मार्टफोन कंपन्या अशा आहेत ज्या फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. 2018 मध्येच रोयल कंपनीने जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘फ्लेक्सपाय’ लाँच केला होता. त्यानंतर सॅमसंगनेही आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनचे प्रोटोटाईप सादर केले. हा फोन आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लाँच केला जाईल. सॅमसंगशिवाय हुवावे, एलजी, ओप्पो आणि विवोसह अनेक स्मार्टफोन कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकतात. . सॅमसंग आणि वेरिजोनचा पहिला 5 जी स्मार्टफोन जूनमध्ये लाँच होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळेया नव्या वर्षात जगाला पहिला 5 जी फोन मिळणार आहे. 5 जी कनेक्टिव्हिटीबाबत जगभरात वेगाने काम सुरू असल्याचे दिसत आहे. 5 जी आल्यानंतर इंटरनेटचा वेग शंभर पटीने अधिक वाढणार आहे. ओप्पो आणि हुवावेही 5 जी फोनबाबत काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात भारतात ते कधी येणार, हा प्रश्नच आहे!
आता आर्टिफिशीअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत उपकरणांमध्ये कमालीचा विकास पाहायला मिळणार आहे. सध्या रिअॅलिस्टिक रोबोंचेही चलन वाढले असून नव्या वर्षात माणसासारखे दिसणारे, वागणारे, मानवी भाषा समजणारे व बोलणारे रोबो पाहायला मिळतील. आरोग्य, सायबर सिक्युरिटी, सपोर्ट सर्व्हिस, कृषी, वाहतूक आदी अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापरही वाढणार आहे. अनेक कंपन्या ड्रोन तंत्रज्ञानावरही नवे काम करीत आहेत त्यामुळे ड्रोनबाबतही कमालीची सुधारणा या वर्षात पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर मायक्रोसॉफ्ट एज्योर, अमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि गुगल क्लाउटसारख्या क्लाऊड सर्व्हीसेसकडे कंपन्यांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येणार आहे.