Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Folic Acid Benefits | शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 9 (Vitamin B9) म्हणजेच फॉलिक अ‍ॅसिड (Folic Acid) खूप आवश्यक आहे. जर शरीरात फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता असेल तर शरीर कमकुवत होते. तुम्ही लवकर आजारांना बळी पडू शकता. फॉलिक अ‍ॅसिड हे शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. फॉलिक अ‍ॅसिडला व्हिटॅमिन बी (Vitamin B) म्हणूनही ओळखले (Folic Acid Benefits) जाते.

 

गर्भधारणेदरम्यान सुंदर केस आणि बाळाच्या वाढीसाठी फॉलिक अ‍ॅसिड आवश्यक आहे. याशिवाय फॉलिक अ‍ॅसिड पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यास, कर्करोगासारख्या (Cancer) गंभीर समस्यांना दूर ठेवण्यास आणि तणाव (Stress) कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी9 च्या कमतरतेमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि त्याची कमतरता खाण्या-पिण्याद्वारे कशी पूर्ण करता येते ते जाणून घेवूयात (Folic Acid Benefits)…

 

फॉलिक अ‍ॅसिडचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Folic Acid)

1. केस गळणे थांबवते (Prevents Hair Fall)
फॉलिक अ‍ॅसिड केस गळती (Hair Fall) रोखण्यास मदत करते, ज्या लोकांना आहारातून फॉलिक अ‍ॅसिड योग्य प्रमाणात मिळत नाही, त्यांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. केसगळती टाळण्यासाठी आहारात फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करा.

 

2. गर्भधारणेसाठी आवश्यक (Essential For Pregnancy)
गर्भधारणेदरम्यान (Pregnancy), स्त्रियांना प्रथम फॉलिक अ‍ॅसिड दिले जाते. फॉलिक अ‍ॅसिड न जन्मलेल्या बाळाची वाढ आणि विकास करण्यास मदत करते.

 

3. पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवते (Enhances Fertility In Men)
पुरुषांमध्ये वंध्यत्व ही एक सामान्य समस्या आहे. अशा स्थितीत पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी फॉलिक अ‍ॅसिड महत्त्वाचे मानले जाते.

 

4. तणाव कमी होतो (Reduces Stress)
आजकाल लोकांच्या आयुष्यात खूप तणाव आहे. ताणतणाव टाळण्यासाठी फॉलिक अ‍ॅसिडचे सेवन करावे. तुमचा तणाव कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

 

5. कर्करोग प्रतिबंध (Cancer Prevention)
व्हिटॅमिन बी 9 कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून तुमचे संरक्षण करण्यास देखील मदत करते. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की फॉलिक अ‍ॅसिडच्या सेवनामुळे कर्करोगाच्या पेशी विकसित होत नाहीत. हे तुम्हाला कॅन्सरच्या धोक्यापासून दूर ठेवते.

* फॉलिक अ‍ॅसिडचा नैसर्गिक स्त्रोत (Natural Source Of Folic Acid)

1 अंडी (Egg) :
अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. शरीरातील फोलेटची कमतरता अंडी खाल्ल्यानेही पूर्ण होऊ शकते. याशिवाय हे प्रोटीन (Protein), कॅल्शियम (Calcium), आयर्न (Iron), मॅग्नेशियम (Magnesium), झिंक (Zinc) यांचा चांगला स्रोत आहे.

 

2. एवोकॅडो (Avocado) :
एवोकॅडो शरीरातील फोलेटची कमतरता देखील बर्‍याच प्रमाणात पूर्ण करू शकते. एवोकॅडोमध्ये फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-बी6 (Vitamin-B6) देखील असते.

 

3. बदाम (Almonds) :
बदामाला सुपरफूड म्हणतात. रोज बदाम खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. बदामामध्ये फोलेट, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक आणि सोडियम असते.

 

4. शतावरी (Shatavari) :
शतावरी ही अशीच एक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. शतावरीमध्ये व्हिटॅमिन-ए (Vitamin-A), व्हिटॅमिन बी1 (Vitamin B1), व्हिटॅमिन बी2 (Vitamin B2), व्हिटॅमिन-सी (Vitamin-C), व्हिटॅमिन-ई (Vitamin-E), मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न देखील असते.

 

5. ब्रोकोली (Broccoli) :
फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस (Phosphorus) यांसारखे घटक आढळतात.

 

6. वाटाणे (Peas) :
मटारच्या सेवनाने तुम्ही शरीरातील फोलेटची कमतरता पूर्ण करू शकता. मटारमध्ये प्रोटीन, फायबर (Fiber), जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

 

7. राजमा (Rajma) :
फॉलिक अ‍ॅसिडसाठी आहारात राजमा खा. राजमा खायला चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. फोलेटसह किडनी बीन्समध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर असते.

 

8. केळी (Banana) :
फोलेट समृध्द पदार्थांमध्ये केळीचाही समावेश होतो. केळी बद्धकोष्ठता (Constipation) दूर करण्यास, दात आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते.

 

9. टोमॅटो (Tomato) :
टोमॅटोचा वापर मुख्यतः भाज्यांमध्ये केला जातो. टोमॅटोमध्ये भरपूर फोलेट असते. टोमॅटोमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी आणि कर्करोगविरोधी गुणधर्म देखील असतात.

 

10. सोयाबीन (Soybean) :
फॉलिक अ‍ॅसिडचा स्रोत म्हणून तुम्ही सोयाबीन देखील खाऊ शकता. फोलेट व्यतिरिक्त, सोयाबीनमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Folic Acid Benefits | folic acid benefits for health this is an important thing in men it increases folic acid know its 5 big benefits and food sources

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Solution Of Hyperpigmentation | तुमच्या कोणत्या चुकांमुळे कपाळावर पडतात काळे डाग? जाणून घ्या कसा करायचा उपचार

 

Lemon Juice Benefits | लिंबूचा रस डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे का?, वाचा सविस्तर

 

Trick For Weight Loss | Lockdown मध्ये वाढेलेले वजन कमी करायचंय तर ऑफिसमध्ये काम करताना वापरा ‘या’ ट्रिक्स; जाणून घ्या