इंदापूर तहसिलवर लोककलावंताचा विविध मागण्यांसाठी जागरण – गोंधळ मोर्चा

इंदापूर – इंदापूर तालुक्यात मागील वर्षी अतिवृृृष्टी व निवडणुक अचारसंहिता तर चालु वर्षी मार्चपासुन कोरोना महामारीमुळे लाॅकडाउन यामुळे सर्वच बाजुंनी आर्थीक संकटात सापडलेल्या लोक कलावंताच्या विविध मागण्यासंदर्भात इंदापूर तालुका वाघ्या मुरळी परीषदेच्या वतीने इंदापूर तहसिल कार्यालयावर ड्रीपर वाद्यासह लोक जागर मोर्चा काढुन विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

इंदापूर तालुका वाघ्या मुरळी परिषदेच्या वतीने मंगळवार दिनांक २० आॅक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता लोक जागर मोर्चाला सुरूवात करण्यात आली.यामध्ये तालुक्यातील शंभर च्या वर महिला व पुरूष कलाकार सहभागी झाले होते. यळकोट यळकोट जय मल्हारचा उदघोष करीत,हळद भंडार्‍यांची उदळण करून ड्रीपर वाद्याच्या तालावर नाचत मोर्चा इंदापूर तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळी परीषदेचे इंदापूर तालुकाध्यक्ष धोंडीराम कारंडे, उपाध्यक्ष अनिल वाघापुरे, तालुका महीला आघाडी संघटक स्वाती काटकर,कार्यध्यक्ष सचिन वाघापुरे यांचे नेतृृत्वाखाली तहसिलदार सोनाली मेटकरी यांना मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

वाघ्या मुरळी कलावंताना उदरनिर्वाहासाठी विशेष अणुदाण निधी मळावा, वाघ्या मुरळी कलावंताच्या मुला मुलींना शिक्षणाची मोफत सोय करण्यात यावी, वाघ्या मुरळी लोककलेस शासन दरबारी अधिकृृत मान्यता मीळावी, कलावंताच्या निवासासाठी शासनाकडुन जमीन, घर यास्वरूपात विशेष योजना मंजुर व्हावी, वाघ्या मुरळी कलावंताना कायम स्वरूपी पेन्शन योजना लागु करण्यात यावी, राज्यातील कलावंतासाठी स्वतंत्र लोककलावंत आर्थीक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, नियमांचे अधिन राहुन लोककलावंताना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मीळावी, देवालये, मंदीरे, राऊळे खुली करण्याचे आदेश व्हावेत इत्यादी मागण्या निवेदना करण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की लोककलावंत अनादी कालापासुन कलेच्या माध्यमातुन धर्मजागरण,कुलधर्म, कुलाचार पालन, समाजप्रबोधन याद्वारे समाजसेवेचे कार्य करत आहे.समाजातील भाविक भक्तांच्या आश्रयावर कुटुंबीयांचा उदर निर्वाह चालतो.परंतु सलग दोन वर्षे अतिवृृष्टी व मार्चपासुनचे कोरोना काळातील लाॅकडाउन यामुळे कलावंताना जगण्यापुरते उत्पन्नही मीळु शकलेले नाही.कोरोना संकटामुळे कुलाचार कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.तरी शासनाने कलावंताच्या मागण्यांचा विचार करून न्याय मीळवुन द्यावा असे नावेदनात नमुद करण्यात आले आहे.