सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव व मोहरमच्या नियोजनाबाबत पोलीस मुख्यालय येथे शांतता समिती सदस्य व विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अधीक्षक शर्मा बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी होते. अधीक्षक शर्मा म्हणाले, राज्यभरातून पूरबाधितांसाठी मदतीचा ओघ सुरू असतानाच आपणही आपले गाव, जिल्हा यासाठी पुढे यावे. खरी गरज कोठे आहे ती जाणून मदत करा. एक गाव एक गणपती बसवा. कुंभार समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढील वर्षीच्या मुर्तीसाठी आताच बुकींग करून आगाऊ पैसे द्या. त्यातून त्यांना आर्थिक मदत उपलब्ध होवून व्यवसायाला हातभार लागेल. यावेळी त्यांनी स्पेशल पोलीस ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात येणार असून सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच पूर्ण होवून त्यालाही गती मिळेल असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त नितीन कापडणीस यांनी मार्गदर्शन केले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी प्रास्ताविक केले. मिरज उपविभागीय अधिकारी संदिपसिंह यांनी आभार मानले. यावेळी महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, निरीक्षक, अजय सिंदकर, मिलिंद पाटील, सहाय्यक निरीक्षक काकासाहेब पाटील, वाहतूक शाखेचेअतुल निकम, संजय क्षीरसागर, कुपवाडचे नीरज उबाळे, उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर