इम्युनिटी वाढवायचीये? तर जाणून घ्या नैसर्गिक पद्धत…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीत इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे आहे. चांगली इम्युनिटी असेल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. परिणामी, इतर आजारातूनही वाचता येऊ शकते.

तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने इम्युनिटी वाढवण्याची गरज आहे. हेच कशाप्रकारे करता येईल याची माहिती भारत सरकारने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यामध्ये म्हटले, की दररोज रंगबिरंगी फळे आणि भाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करावे. त्यामुळे शरीरात मिनरल्स आणि व्हिटॅमिनची गरज भासत नाही. दररोज डार्क चॉकलेटचे सेवन करावे. चॉकलेटमध्ये 70 टक्के कोकोआ असते. त्यामुळे कोकोआयुक्त डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणावापासून दूर राहता येते.

जाणून घ्या आणखी काय म्हटले…

– हळदीचे दुधाचे दररोज सेवन करावे

– कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांच्या तोंडाला चव आणि वास येणे बंद होते.

– सॉफ्ट वस्तू खाव्यात. तसेच चव वाढवण्यासाठी आमचूरचा वापर करावा.

– कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांना व्हिटॅमिन आणि प्रोटिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्नायू आणि इम्युनिटी मजबूत होते. त्यासाठी चिकन, अंडी, मासे, पनीर आणि सोयाबीनचा वापर आवश्य करावा.

– सुका मेवा, अक्रोड, बदामाचे सेवन करावे.

– याशिवाय दररोज योगा आणि ब्रीदिंग एक्सरसाईज करावे.