कोरोनानंतर कोरडा खोकला अन् कफामुळं असाल परेशान तर ‘या’ टिप्सचा नक्की होईल फायदा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून काळजी घ्यायला हवी. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर येणारा थकवा आणि खोकला Cough बरा होण्यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात.

दिलासादायक ! भारतातील कोरोना संक्रमणाचा वेग घसरतोय, जाणून घ्या गेल्या 24 तासातील आकडेवारी

कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णांना इतर लक्षणांबरोबर सर्दी आणि खोकल्याचाही Cough त्रास सुरु होतो. कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील काही काळ खोकला राहतो. कोरडा खोकला अन् कफामुळे थकवा जास्त येतो. त्यामुळेच तो बरा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरडा खोकला येत असेल तर, शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. थोड्या थोड्या वेळाने वाफ घेण्याने देखील घसा मोकळा होण्यास मदत होईल. कोरडा खोकला असल्यास सतत खोकल्याने छातीमध्येही दुखते. अशावेळी कोमट पाणी घेणे फायदेशीर ठरते. खोकल्यामुळे पाणी पिताना त्रास होत असेल तर, छोटे- छोटे घोट घेऊन पाणी प्यावे. कोरडा खोकला असेल तर वाफारा घेण्यानेही फायदा होतो. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. त्या भांड्यावर आपला चेहरा नेऊन श्वासाद्वारे वाफ आत घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी टॉवेल देखील वापरू शकता. टॉवेलने चेहरा झाकून वाफ घेतल्यास जास्त चांगली वाफ मिळते. यासह आज-काल स्टीम मशीन देखील बाजारात उपलब्ध आहेत. कोरडा खोकला असेल तर लिंबू आणि मध गरम पाण्यात टाकून पिण्याने देखील घशाला आराम मिळेल.

कफाचा त्रास
कफाचा खोकला झाला असल्यास त्यातून बरे होणे जरा कठीण होते. सतत कफ येत असल्याने थुंकून बाहेर काढावा लागतो. मात्र कोरोनाच्या काळात बाहेर थुंकल्याने कोरोना पसरण्याची भीती आहे. घरात देखील कफ थुंकत असल्यास त्या ठिकाणी डिसइन्फेक्टर वापरणे गरजेचे आहे. खोकल्यात कोमट पाणी, एखाद सूप, हर्बल टी किंवा काढा प्यायल्यामुळे शरीरात हायड्रेशन वाढते. छातीमध्ये कफ साठून राहिला तर तो पातळ होण्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा वाफारा घ्या. झोपताना पाठीवर झोपण्या ऐवजी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे कफ बाहेर निघण्यास मदत होते. सतत खोकला येत असेल तर घरातल्या घरात थोड चालण्यानेही फरक पडतो.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून