गर्मीमध्ये मरूम आणि केसांच्या समस्येसाठी ‘या’ खास टीप्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वाढत्या तापमानामुळे चेहऱ्यावरील चमक कमी होते. त्यावरअनेक आयुर्वेदिक उपाय आहेत, जे आपण घरी तयार करू शकतो. त्याचे दुष्परिणामही नाहीत. चेहऱ्याच्या अनेक समस्यां यापासून दूर होतात.

१) चंदनाचा लेप
चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी घालून ते चेहऱ्यावर लावा. ते कोरडे झाल्यानंतर धुवा. चेहर्‍यावर मुरुम असल्यास १ चमचा चंदन पावडर आणि एक चमचा तांदळाचे पीठ दुधात मिसळून मिश्रण बनवा आणि चेहऱ्यावर लावा. चंदनच्या थंडपणामुळे त्वचेला आराम मिळतो. हे मिश्रण मृत पेशी काढून टाकते.

२)कोरफड – लिंबू
दोन चमचे कोरफडमध्ये एक चमचा गुलाबपाणी आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. ते १५ मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावा आणि धुवून टाका. यामुळे त्वचेचा उजळपणा वाढेल.

३)बेसन आणि हळद फेस पॅक
थोडेसे लैव्हेंडर तेल घ्या, दोन चमचे हरभरा पीठ, एक चिमूटभर हळद, एक चमचा लोणी किंवा ताजी मलई. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. या मिश्रणामुळे मृत त्वचा बाहेर येते.

४)मुलतानी माती
तेलकट त्वचा असल्यास मुलतानी मातीचा लेप हा एक चांगला पर्याय आहे. अर्ध्या तासासाठी मुलतानी माती पाण्यात भिजवा. त्यात गुलाब पाणी घाला आणि चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर ते धुवून टाका.

५)मध-लिंबू
मध त्वचेची चमक वाढवतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. ते चेहऱ्यावर लावा, कोरडे झाल्यावर ते पाण्याने धुवा.

केस कसे मजबूत करावे
आजकाल केस गळणे सामान्य आहे. घरगुती उपायांनी केस अधिक मजबूत बनवू शकता.

१)बटाट्याचा रस
बटाट्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि बी केसांना निरोगी बनवतात. यासाठी बटाट्याचा रस काढून केसांच्या मुळांवर दीड तास ठेवा. मग आपले केस धुवून टाका.

२) कडुलिंब
यामुळे डोक्यातील कोंडा, खाज सुटणे आणि डोके दुखणे देखील दूर होते. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर जास्त पाणी घालून गाळून घ्या. त्यानंतर ते लावा.