चांगली आणि गाढ झोप येण्यासाठी ‘हे’ उपाय पडतील उपयोगी, लवकरच दिसेल फरक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चांगली झोप घेऊन दिवसाचा कंटाळा दूर करू शकतो. परंतु, आजच्या काळात तणाव आणि चिंतामुळे प्रत्येकजण अस्वस्थ आहे. यामुळे अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवत आहे. परंतु, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. शारीरिक आणि मानसिक विकासाच्या देखील समस्या उद्भवतात. तसेच, झोप न लागल्यामुळे दिवसभर शरीर थकलेले राहते. अशा वेळी काम योग्य प्रकारे करण्यात अडथळे येतात. जर आपण देखील रात्री न झोपण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काही उपाय करू ज्यामुळे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत होईल.

१) निरोगी गोष्टी खा
रात्री चांगली झोप येण्यासाठी नेहमीच हलके अन्न खावे. तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने एखाद्याला शरीरात जडपणा वाटतो. यामुळे आपल्याला रात्री झोपेच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी उच्च कॅलरीऐवजी, प्रथिने, चरबी आणि कार्बयुक्त पदार्थ खा.

२) रात्रीचे जेवण असे असावे
रात्री चांगली आणि गाढ झोपेसाठी हलके जेवण खा. आपणास बरे वाटेल आणि आपले शरीर हलके होईल.

३) १५ मिनिटे चाला
झोपेच्या आधी सुमारे १५ मिनिटे फेरफटका मारा. यामुळे चांगली झोप लागेल तसेच दिवसाचा थकवा दूर होण्यास मदत होईल.

४) झोपेच्या आधी गॅझेटपासून दूर राहा
बरेचदा लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टेलिव्हिजन, लॅपटॉप इ. सारख्या गॅझेटचा वापर करतात. त्यातून निघणारा निळा प्रकाश मनाला आणखीन जागृत करण्यासाठी कार्य करतो. यामुळे आपल्याला रात्री झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. म्हणून दररोज झोपायला जाण्यापूर्वी सुमारे २ तास या गोष्टींचा वापर करणे टाळा.

५) चहा आणि कॉफीचे जास्त सेवन टाळा
चहा आणि कॉफी मनाला ताजेतवाने आणि सक्रिय करण्यास मदत करते. दुसरीकडे त्यामुळे झोपेच्या समस्येचा सामना करावा लागतो. आपण निद्रानाश ग्रस्त असल्यास याचे सेवन करणे टाळावे.

६) योग देखील फायदेशीर आहे
दररोज सकाळी २०-३० मिनिट मोकळ्या हवेत योग करा. आपण उत्तनासना, पश्चिमोत्तासन, अपनासना, शवासन हे योग करू शकता. यामुळे हृदयाचे आणि मनाचे कार्य अधिक चांगले होते. तसेच आपण तणावमुक्त होतो आणि आतून आनंदाची भावना येते. दिवसभर उत्साही राहण्यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.