‘पती-पत्नी’मध्ये कधीच नाही होणार ‘भांडण-तंटा’ जर लक्षात ठेवल्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुखी संसाराचे प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. वास्तुनुसार प्रत्येक पती पत्नीमध्ये प्रेम राहण्यासाठी वास्तू देखील तेवढीच बरोबर असली पाहिजे. यामध्ये तुमची बेडरूम नेमकी कशाप्रकारे असावी किंवा सैदव प्रेम टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टींमध्ये बदल करणे गरजेचे आहे हे देखील समजले आवश्यक असते आणि वास्तुदोष असलेल्या ठिकाणी याबाबतची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

Image result for bedroom,nari

अशी असावी खोली (बेडरूम )
नवविवाहित जोडप्याची खोली अर्थात बेडरूम उत्तर पश्चिम क्षेत्रामध्ये म्हणजेच वायव्य दिशेला असली पाहिजे. तसेच पती पत्नीने खोलीच्या दक्षिण पूर्व दिशेला झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने खोलीत सकारात्मक वातावरण वाढते. ज्यामुळे जोडप्यामध्ये प्रेम वाढत जाऊन नाते घट्ट होते.

ब्रह्म स्थान योग्य नसेल तर वाढू शकतो तणाव
वास्तुशास्त्रानुसार घराचे ब्रह्म स्थान लहान असणे, उघडे न ठवणे, त्या ठिकाणी जड वस्तू ठेवणे यामुळे वैवाहिक जीवनात नाराजी निर्माण होते. घरामध्ये नैर्ऋत्य कोण खाली असणे अग्नी तत्वामध्ये वास झाल्याने वैवाहिक जीवनात तणाव आणि कलह निर्मिती होऊ शकते.

Image result for mirror in bedroom,nari

ड्रेसिंग टेबल आणि आरश्याची घ्या काळजी
बेडरुमधे ड्रेसिंग टेबल किंवा आरसा असणे यामुळे जोडप्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. खोलीमध्ये आग्नेय बाजूला पाण्याशी संबंधित कोणत्याही गोष्टी असल्या तर जोडप्याच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.

Image result for cactus,nari

बेडरुमधे झाडाची रोपटी ठेऊ नका
बेडरूममध्ये काटेरी झाडे झुडुपे अजिबात ठेऊ नका. बेडची गादी देखील वेगवेगळी न ठेवता एक ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर यामुळे भावी आयुष्यात वाद निर्माण होऊ शकतात.

घडस्फोटापर्यंत जाऊ शकतो विषय
घराच्या ईशान्य कडील भागात बाथरूम बनवलेले असेल तर वैवाहिक जीवनासाठी ही चांगली बाब समजली जात नाही. त्याचप्रमाणे हा कोपरा जर अनेक वस्तुंनी भरलेला आणि घाणेरडा असेल तर वैवाहिक जीवनात याचा मोठा परिणाम दिसून येतो. यामुळे वाद निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते.

अशा प्रकारचे फोटो लावणे टाळा
बेडरुमधे तिजोरी,पैसे, कॅश आणि देवांचे फोटो असणे जोडप्यासाठी अनुकूल मानले जात नाही. त्याचप्रमाणे डुबणारे जहाज, महाभारताच्या युद्धाचा फोटो. हिसंक प्राण्यांचे फोटो लावता कामा नहे. हेय विवाहित जोडप्यासाठी अशुभ मानले जाते. असे केल्याने त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनात तणाव आणि वादाचे कारण निर्माण होऊ शकते.

भिंतींचा रंग
बेडरूमच्या भिंतींचा रंग डार्क असल्याने आणि वॉश बेसिंग देखील बेडरुमधे असल्यास ते अशुभ मानले जाते. यामुळे जोडप्याच्या आयुष्यात भांडणे निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला जर स्टोअररूम असेल तर ते देखील तणावाचे कारण ठरू शकते.

फेसबुक पेज लाईक करा –