Lockdown मध्ये वजन वाढलेय का? फॉलो करा ‘हे’ डाएट, 1 आठवड्यात होईल कमी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉकडाऊनमध्ये सर्व लोक घरीच आहेत, अशावेळी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे खाणे ट्राय करत आहे. ज्यामुळे सध्या लठ्ठपणाची समस्या लागोपाठ वाढत चालली आहे. यासाठी आम्ही आज सांगणार आहोत मूग डाळीच्या डाएट Diet बाबत, ज्याद्वारे तुम्ही 10 दिवसात 5 किलो वजन कमी करू शकता !

नियम सर्वांना सारखाच ! बीडमध्ये चक्क न्यायाधीशांना 200 रुपयांचा दंड, कर्तव्यावरील पोलिसाच्या प्रामाणिकतेचा परिचय

मूग डाळीचे फायदे
मूग डाळीचे सेवन नेहमी आजारपणात केले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. या डाळीची खिचडी किंवा मोड आलेल मूग खाल्ल्याने शरीराचे वजन कमी होते. सालीची मूगडाळ गावठी तूपासोबत सेवन केल्यास अनेक रोग सुद्धा दूर होतात. तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचे असेल तर मूग डाळीचे डाएट Diet आवश्य करा…

डाएट असे करा फॉलो
दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा आणि किमान दोन ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे बॉडी टॉक्सिन बाहेर पडते आणि शरीर हायड्रेटेड राहते. पाणी पिण्याच्या एक तासानंतर तुम्ही योगा, वॉकअप योगा, वॉक किंवा प्राणायाम करा. कारण लॉकडाऊन आहे यासाठी तुम्ही वॉकसाठी बाहेर जाऊ नका, घराचे टेरेस किंवा बाल्कनीचा वापर करा.

मूग डाळीचे सूप
डाएटच्या पहिल्या दिवशी मूग डाळीचे सूप बनवा. हे दिवसात 6 वेळा प्या. हे बनवण्यासाठी मूग डाळीत आले, मीठ, हिंग, जीरे, बडीसोप, कोथेंबिर, हिरवी मिरची टाकून उकळवा. हे तीन दिवस फॉलो करा. जर पहिल्या दिवशी कमजोरी जाणवत असेल तर दुसर्‍या दिवशी सूप पिण्याची मात्रा वाढवा. हलकी डोकेदुखी किंवा घबराट जाणवू शकते, परंतु घाबरू नका, हे डिटॉक्टसच्या प्रक्रियेमुळे होते.

काय खाऊ नये
मूग डाळ डाएटवर असाल तर आंबट वस्तू जसे की, टामॅटो, लिंबू, दही इत्यादीचा वापर करू नका. डाएटच्या Diet दरम्यान तूप आणि तेलाचे बिलकूल सेवन करू नका.

चहा कॉफीची मदत घ्या
रिफ्रेश होण्यासाठी विना साखरेचा चहा किंवा कॉफी पिऊ शकता. याशिवाय दिवसभर 8 ते 10 ग्लास पाणी सुद्धा प्या.

5 दिवस असे ठेवा डाएट
मूगाच्या सूपसह भाज्यांना सुद्धा डाएट प्लॅनमध्ये सहभागी करा. भाज्या कापून उकळवून किंवा वाफेवर शिजवून सलाडमध्ये खाऊ शकता. सलाडसाठी गाजर, काकडी, बीट, मुळा, दुधीभोपळा, तोंडली, कोबी, कांदा, भोपाळा घेऊ शकता.

हे लक्षात ठेवा
* भूकेनुसार सूप आणि भाज्यांचे सेवन करा.
* सकाळी हेवी खाणे पसंत असेल तर उकडलेल्या भाज्या खा.
* ब्रेकफास्टमध्ये भाज्या खाल्ल्यानंतर मूग डाळीचे सूप प्या.

अखेरचे दोन दिवस काय खावे
सूपसोबत मूग डाळीचा डोसा बनवा. डोसा बनवण्यासाठी कांदा, आले, टोमॅटो, मीठाचा वापर करा. दिवसात तीन वेळा एक-एक डोसा खा आणि दिवसात 6 वेळा सूप प्या.

डाएट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वजनात नक्की बदल दिसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा की, डाएट संपल्यानंतर हळुहळु ठोस आहाराचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा.

 

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त