पुण्यातील ‘येवले चहा’वर FDA ची कारवाई, 6 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चहा प्रेमींचे आवठते ठिकाण म्हणजे पुण्यातील येवले अमृततुल्य चहा. या चहाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण येत असतात. याच येवले चहा विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चहामध्ये मेलानाईटचा भरपूर प्रमाणात वापर चहा तयार करण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे. ही माहीती मिळाल्यानंतर पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार आणि रमाकांत कुलकर्णी यांनी कारवाई केली. ही कारवाई येवला फुट प्रॉडक्ट गोडाऊन नं. 3 सर्वे नं. 45 1/2, बोहरी शाळेजवळ, वेळेकर नगर, कोंढवा, पुणे याठिकाणी करण्यात आली.

येवले फुड प्रॉडक्ट गोडाऊनमधील विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेली चहा पावडर, साखर, टी मसाला यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 6 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या उत्पादनावर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असणारी माहीत छापणे अनिवार्य आहे. मात्र, जप्त केलेल्या पाकिटांवर कोणत्याही प्रकारची माहिती किंवा लेबल लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यामध्ये नेमका कोणता अन्न पदार्थ आहे, त्यात निश्चित घटक पदार्थ किती प्रमाणात आहे याची माहिती सर्वसामन्याांना देण्यात आलेली नाही.

आवश्यक असलेला परवाना नाही
धक्कादायक बाब म्हणजे अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत खातरजमा होण्यासाठी प्रयोगशाळेकडून तपासणीही केलेली नाही. शिवाय, येवले फुड प्रॉडक्ट यांनी विक्रीसाठी उत्पादीत केलेल्या सर्व अन्न पदार्थाची विक्री अन्वी डिस्ट्रीब्युटर्स कात्रज यांच्या मार्फत करण्यात येते. मात्र, या वितरकाडे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार आवश्यक असलेला परवाना नसल्याचे तपास चौकशीत आढळुन आले आहे.

उत्पादन व विक्री बंद ठेवण्याचे आदेश
विक्रीसाठी उत्पादीत केलेल्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबात खातरजमा होण्यासाठी प्रयोगशाळेकडून तपासणी केलेली नाही. तसेच कार्य़रत कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र नाहीत. ही बाब समोर आल्यानंतर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने येवले यांना पुढील आदेश मिळेपर्य़ंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Visit : policenama.com