अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. कृष्णा नामदेव दाभाडे (52, रा. दहेगाव, ता. शेगाव, जि. अहमदनगर) असे त्या अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

दाभाडे यांनी आटा मिलवर नोव्हेंबर 2019 मध्ये छापा टाकला होता. त्यावेळी आढळलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 25 हजार आणि परवाना नुतणीकरणासाठी 10 हजार रूपये अशी एकुण 35 हजार रूपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती. लाच खासगी व्यक्तीव्दारे घेतली. गुरूवारी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे हनपुडे पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. पुढील कारवाई चालु आहे. 13 मार्च रोजी एमआयडीसी बीडमधील आटा मिलच्या मालकाकडे लाचेची मागणी करण्यात आली होती.