महाराष्ट्रात गुटखा बंदी ? काय सांगता, होय – गोडाऊनवरील छाप्यात पावणे 3 कोटींचा माल जप्त

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – भिवंडीमधील खारबाव येथील एका मंगलकार्यालयात साठवणूक करण्यात आलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज्यात गुटखा बंदी असताना त्याची विक्री जोमात सुरू असल्याचे पाहिला मिळते.

याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात उमाकांत नारायण काटे, अमरबहाद्दूर रामखीलावन सरोज, फजल व राजु गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राजू गुप्ता याला अटक केली आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुटखा बंदी आहे. परंतु, तरीही गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. मोठ्या व्यावसायिकांकडून गुटखा साठवणूक करण्यात येतो. त्यासाठी बहुदा गावाच्या बाहेर असणार्‍या मोठ-मोठ्या हॉल पाहिले जातात. तेथून हा गुटखा इतरत्र दिला जातो. त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.

दरम्यान, ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या सह आयुक्त एस. एस. देसाई यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उमाकांत काटे यांच्या मालकीचे गोदामात मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक करण्यात आली आहे. हे गोडाऊन पुर्वी मंगल कार्यालय होते.

त्यानुसार, अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे तसेच, सह आयुक्त देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी गुटखा, पान मसाला तसेच इतर तंबाखु जन्य पदार्थ मिळून आले आहेत. पथकाने येथून तब्बल 2 कोटी 74 लाख 51 हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा साठा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

फेसबुक पेज लाईक करा –