उस्मानाबाद : येरमाळ्यात अन्न व औषध प्रशासनाकडून 282 किलो बनावट खवा पकडला, सर्वात मोठी कारवाई

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – सांगली येथून येणारा बनावट खवा येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या बाबत अन्न व औषध प्रशासनाने वारंवार धाडी मारूनही बनावट खवा हाती लागत नव्हता. आज गुरुवार दिनांक १९ रोजी बनावट खवा एसटी द्वारे येत असल्याची माहिती मिळाल्याने केलेल्या कारवाईत २८२ किलो बनावट हवा रंगेहात पकडण्या आला. याबाबत येथील स्वामी समर्थ खवा विक्री केंद्रावर खवा जप्त करून तो नष्ट करून विक्री केंद्राला सील केल्याची कारवाई केली. असली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार थातुरमातुर कारवाई करुन बनावट खव्याचे सत्र चालू असल्याने बनावट व्यवसायावर कठोर कारवाई केली जात नसल्याने बनावट खवा विक्री जोमात सुरू असून अशा लोकांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय यांना आळा बसणार नाही अशी लोकातून चर्चा होत आहेत

Khava

येरमाळा येथील दाखवा केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात दुधापासून तयार केलेला खवा वितरण गेल्या अनेक वर्षापासून केले जात होते राज्यातील एकमेव खवा केंद्र म्हणून येरमाळा केंद्राची ओळख निर्माण झाली होती मात्र गेल्या सहा महिन्यापासून या शुद्ध खवा वितरण केंद्राला बनावट खव्याचे ग्रहण लागले होते. याबाबत लोकांच्या चर्चेतून अनेक वेळा येथील खवा वितरण दुकानाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करण्यात आली मात्र सांगली येथून येणारा बनावट खावा लागत नव्हता. हा बनावट खवा एसटी बस द्वारे सांगली येथून राजरोसपणे आणून वितरीत केला जात असे. याबाबतही अन्न व औषध प्रशासन विभागाला गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी आज रोजी कोल्हापूर-माजलगाव या बसमधून आलेला आठ गोण्यातील सुमारे २८2 किलो खवा जप्त करण्यात आला. या बनावट खावयाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले असून उर्वरित 288 किलो बनावट खवा येरमाळा कळंब रोडवरील तेरणा नदीच्या पाण्यात नष्ट करण्यात आला. ही कारवाई औषध प्रशासन विभागाच्या रेणुका पाटील व सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी मिळून कारवाई केली भीमराव डांगे यांच्या मालकीच्या स्वामीसमर्थ खवा विक्री केंद्राला सील ठोकले.

सांगली येथून येणारा खवा लाडा डिटर्जंट पावड, शॅंपू सोयाबीन निकृष्ट दूध पावडर यांच्यापासून तयार केला जात असून यामुळे ग्राहकांच्‍या जीविताला धोका निर्माण झाला असुन यामुळे शेतकरी दुध उत्पादकांचे दुग्धव्यवसाय अडचणीत आले आहेत. आजच्या अन्न व औषध विभागाच्या कारवाई नंतरही बनावट खव्याच्या आणखीन गोण्या दुकानातून बाहेर आल्याने आजची कारवाईही बनावट असल्याचे लोकात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून आज पर्यंत केलेल्या कारवाईत एकही विक्रेत्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बनावट खवा विक्रेते निर्ढावले असुन आशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांतून होत आहे.

Khava

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वारंवार कारवाईच्या नाट्यमय कारवाईमुळे चांगल्या प्रतीचा खवा तयार करून विक्री करत असलेल्या लोकांबद्दल ही बदनामी होत असून या कारवाईचा चांगल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे बनावट खवा विक्री करणार्‍यावर गुन्हे दाखल केल्या शिवाय हा प्रकार थांबणार नाही असे लोकातून बोलले जात आहे

या बनावट खवा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणारे लहू बारकुल यांनी यावेळी बोलताना सांगितले की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यापूर्वीही बनावट हवेचे नमुने नेहून आज पर्यंत त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करत असून यामुळे चांगल्या प्रतीचा खवा निर्मिती विक्रेते यांना नाहक त्रास होत असून आजपर्यंत घेतलेल्या खवा नमुन्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणतीच कारवाई केली नाही अशा बनावट खवा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय बनावट खव्याचा व्यापाराला आळा बसणार नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/