Food Delivery APP-GST | 1 जानेवारीपासून अ‍ॅपवरून जेवण मागवल्यास लागेल टॅक्स! ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस महागणार का? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Food Delivery APP-GST | जर तुम्ही ऑनलाईन जेवण मागवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण अ‍ॅपवरून खाद्यपदार्थ मागवणार्‍या ग्राहकांना माहित असावे की, मोदी सरकारने (Modi Government) झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर 5 टक्के टॅक्स (Tax on Online Food Delivery) लावला आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होत आहे. (Food Delivery APP-GST)

 

फूड डिलिव्हरी अ‍ॅपला द्यावा लागेल 5 टक्के टॅक्स
केंद्रीय अर्थ मंत्रालयांच्या (finance minister of india) आदेशानुसार अ‍ॅप कंपन्यांना रेस्टॉरंटप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळणार नाही. मोठ्या कालावधीपासून फूड डिलिव्हरी अ‍ॅपच्या सेवांना जीएसटी (GST) च्या कक्षेत आणण्यासाठी 17 सप्टेंबरच्या जीएसटी परिषदेच्या (GST Council) बैठकीत मंजूरी देण्यात आली होती. ही नवीन व्यवस्था देशभरात 1 जानेवारी 2022 पासून लागू केली जात आहे. (Food Delivery APP-GST)

ग्राहकांवर काय होणार परिणाम

– 5 टक्के टॅक्स सरकार फूड डिलिव्हरी करणार्‍यांकडून वसूल करेल आणि या कंपन्या वेगळ्या मार्गान ग्राहकांच्या खिशातून हे पैसे काढून घेतील.

यामुळे 1 जानेवारीपासून ऑनलाइन फूड ऑर्डर करणे महाग होऊ शकते.

रेस्टॉरंटला हा 5 टक्के टॅक्स द्यावा लागत होता, आता तो अ‍ॅपवर लावला आहे.

आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारे अ‍ॅप्स आता त्याच रेस्टॉरंटमधून फूड आर्डर घेतील, जे जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत आहेत.

 

Web Title :- Food Delivery APP-GST | food delivery app must pay gst from 1 january 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MahaTET Exam Paper Leak Case | ‘टीईटी’चा 2018 चा पेपर देखील… ! पुणे पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त ‘सुखदेव डेरे’ याच्यासह GA Software चा बंगलुरुचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारला अटक

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक

Tukaram Supe Suspended | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर ठाकरे सरकारकडून मोठी कारवाई

ST Workers Strike Called Off | अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, 54 दिवसांनी निघाला ‘तोडगा’; महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेची घोषणा

Hamsa Nandini Breast Cancer | अभिनेत्री हमसा नंदिनीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर करून दिला जबरदस्त संदेश…