परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शेतक-यांना धान्य वाटप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते नगर तालुक्‍यातील अकोळनेर, खंडळा येथील छावणीतील शेतक-यांना गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्‍यात आले.

रावते यांनी अकोळनेर येथील जनावरांच्‍या छावणीस भेट दिली. यावेळी राज्य विधानसभा उपाध्‍यक्ष विजयराव औटी, माजी राज्‍यमंत्री अनिल राठोड, संदेश कार्ले, रामदास भोर , तहसीलदार रोहिणी नऱ्हे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे, प्रभारी गट विकास अधिकारी वसंतराव गारुडकर आदि उपस्थित होते.

रावते म्‍हणाले, दुष्‍काळ हा खरीप हंगाम संपल्‍यानंतर म्‍हणजेच ऑक्‍टोबर महिन्‍यात दुष्‍काळाबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्‍यात आल्‍या. पहिल्‍या जनावरांच्‍या छावण्‍या लवकर सुरु झाल्‍या आहेत. नाशिकच्‍या गोदावरी नदीच्‍या पाण्‍यावर नगर, मराठवाडा अवलंबून असतो. यावेळी नाशिक जिल्‍हयात कमी पाऊस झाल्‍याने दुष्‍काळी परिस्थिती निर्माण झाली.

छावणीतील जनावरांच्‍या चारा रक्‍कमेत वाढ करण्‍यात आली व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात आला. आचारसंहिता संपल्‍यावर छावणतील जनवारांसाठी मुक्कामास असलेल्‍या शेतक-यांना मदत म्‍हणून गहू 10 किलो,तांदूळ 5 किलो व डाळ 1 किलो धान्‍याचे वाटप यावेळी करण्‍यात आले. तसेच अकोळनेर व खंडाळा येथील शेतकरी व महिलांशी श्री दिवाकर रावते यांनी संवाद साधला.

औटी म्‍हणाले, पावसाला लाबल्‍यामुळे छावणीतील पशुधन अडचणीत आहे. तसेच त्‍यांना संभाळणा शेतक-याला मदत म्‍हणून गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमास अकोळनेर व खंडाळा छावणीतील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

आरोग्य विषयक वृत्त – 

नेत्रदानात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम

जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

क्रिम्सने नव्हे, व्हिटॅमिन्समुळे स्ट्रेच मार्क्स होतात नाहीसे

स्वाईन फ्लूसाठी नवी औषधे द्या, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडे मागणी