उपाशीपोटी ‘व्यायाम’ केल्यास वजन लवकर कमी होते, हा गैरसमज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उपाशीपोटी व्यायाम केल्यास फॅट लवकर कमी होते, असा गैरसमज अनेकांमध्ये असतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीरात ग्लुकोज असणे खूप आवश्यक असून शरीरातील ग्लुकोज संपले तर फॅट कमी करणारी प्रक्रियाच काम करत नाही. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी थोडा नाष्टा किंवा हलका प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात.

उपाशीपोटी व्यायाम करून कॅलरीज बर्न करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांचे शरीर अशक्त होते. स्नायू आकसले जातात. एखाद्या व्यक्तीचे वय, बॉडी मास इंडेक्स, लिंग आणि दिनचर्या यावर फॅट कमी होण्याची प्रक्रिया अवलंबून असते. कॅलरीज बर्न करण्यासाठी ताकद लागते. पण उपाशी राहिल्याने ती मिळत नाही. हलका आहार घेतल्यावर काही वेळाने व्यायाम करावा. व्यायामानंतर स्टड्ढेचिंग करावे. यामुळे जास्त जलदगतीने फॅट कमी करता येऊ शकते. सकाळी आपली चयापचय प्रक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी उपाशीपोटी व्यायाम केल्यास अनेक दुुष्परिणाम होऊ शकतात. उदा. शरीर सुस्त होणे, नैराश्य येणे, थंडी किंवा उष्णता वाढल्याने रक्तदाबही कमी होऊ शकतो.