Food For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ’संजीवनी’ आहेत पिवळ्या रंगाच्या ‘या’ 5 गोष्टी, Blood Sugar ठेवतात कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Food For Diabetes | डायबिटीजमध्ये (Diabetes) तुम्ही अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी (Glycemic Index Level) कमी असते आणि साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण (Sugar And Carbohydrates Level) कमी असते. असे मानले जाते की कमी ग्लायसेमिक इंडेक्स मूल्य असलेले पदार्थ (Food For Diabetes) ब्लड शुगरचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकतात (Low Glycemic Index Foods For Diabetics).

 

मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. याचा अर्थ असा की एकदा का कोणाला तो झाला तर त्यातून बाहेर पडू शकत नाही. या आजारात रुग्णाची ब्लड शुगर (Blood Sugar) झपाट्याने वाढू लागते, त्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे (What Should Diabetic Patients Eat) ?
मधुमेही रुग्णांना सकस आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण त्यातूनच ब्लड शुगर नियंत्रण (Blood Sugar Control) ठेवता येते. धान्य, पास्ता, फळे, दूध, मिठाई आणि ब्रेड यासारखे कार्बोहायड्रेट्स ब्लड शुगर वाढवू शकतात. तुम्ही या गोष्टी टाळा किंवा फार कमी सेवन करा (Food For Diabetes).

 

मधुमेहामध्ये, तुम्ही अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (low Glycemic Index Foods) आहे आणि शुगर आणि कार्बोहायड्रेट्स कमी आहेत. असे मानले जाते की कमी ग्लायसेमिक इंडेक्स मूल्य असलेले पदार्थ ब्लड शुगरचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकतात. या लिस्टमध्ये अनेक गोष्टी येतात, पण आम्ही तुम्हाला पिवळ्या रंगाच्या अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या ब्लड शुगर नियंत्रित ठेवतात आणि तुमचा थकवा आणि कमजोरीही दूर करू शकतात.

1. भोपळा आणि त्याच्या बिया (Pumpkin And Its Seeds)
एका अभ्यासानुसार, पिवळ्या रंगाचा भोपळा फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा (Fiber And Antioxidants) खजिना आहे, जो ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. मेक्सिको आणि इराण सारख्या अनेक देशांमध्ये भोपळ्याचा वापर मधुमेहावरील उपचार म्हणून केला जातो. भोपळ्यामध्ये पॉलिसेकेराइड्स नावाचे कार्बोहायड्रेट जास्त असते, जे ब्लड शुगर नियंत्रित करते.

 

2. लिंबू (Lemon)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी लिंबू हा उत्तम पर्याय आहे. लिंबू पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते.
त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात आणि तुम्हाला हायड्रेट ठेवते.
मधुमेहाच्या रुग्णांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांच्यासाठी लिंबूपाणी सर्वात फायदेशीर ठरू शकते.

 

3. पीच (Peach)
पीच हे असेच एक फळ आहे ज्यामध्ये शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व आढळतात.
त्यात नैसर्गिक साखर असते. हे ब्लड शुगर नियंत्रित करते. त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्सचे जीआय रँकिंग 28 आहे.

 

4. पिवळे गाजर (Yellow Carrots)
गाजरातील बीटा कॅरोटीन दृष्टीस मदत करण्यासाठी ओळखले जाते आणि त्यात व्हिटॅमिन ए (Vitamin A) देखील जास्त असते.
हे तुम्हर मटार सोबत खाऊ शकता. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे जो फक्त 19 आहे.

5. जर्दाळू (Apricot)
जर्दाळू हे एक स्वादिष्ट फळ आहे, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय आहे.
हे मनुका सारखे वाळवून देखील खाल्ले जाते.
यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात.
कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे, तुम्ही त्याचा आहारात सहज समावेश करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Food For Diabetes | according to research these 5 yellow color food easily control blood sugar level in diabetics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या सभेवर गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

 

Raj Thackeray on Mahaarati | मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द, राज ठाकरेंचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाले…

 

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही’ ! राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या डेडलाईनवर संजय राऊतांचा पलटवार