हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्यांना हृदयाचा आजार आहे, त्यांच्यासाठी खूप पथ्यपाणी असते. अशा लोकांनी आहार विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. हृदयरोग्यांनी फॅटयुक्त जेवण टाळावे, असे सांगितले जाते. सॅच्युरेटेड फॅटचा थेट संबंध कोरोनरी हार्ट डिसिजशी असतो. हृदयाचे आजार असणारांनी फॅटयुक्त जेवणाऐवजी ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादी पौष्टिक खाद्य पदार्थ खावेत. या पदार्थांमधील घटक हृदयरोगापासून सुरक्षा देतात. हृदय निरोगी राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हृदयरोग्यांसाठी मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल दोन्हीही मोनोसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहेत. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगर दोन्हींची पातळी कमी राहते. हृदय रुग्णांसाठी या तेलांमध्ये शिजवलेले अन्न खाणे औषधाचे काम करते. ग्रीन किंवा ब्लॅक ऑलिव्ह खाणेही चांगले आहे. कोलेस्टेरॉल संपवण्यासाठी धान्याची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु, हृदयरोग्यांना केवळ धान्याचे सेवन करणे पुरेसे ठरत नाही. ओट्स त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यातही फ्लेवर्ड ओट्स साखरेमध्ये तयार केले जातात. त्यामुळे प्लेन ओट्स आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत.

लोहाची कमतरता असलेल्या लोकांनी शेंगा, पालक इत्यादी हिरव्या भाज्या आणि बेदाण्याचे सेवन केले पाहिजे. लोहाची पातळी पौष्टिक जेवणानंतरही खालावत असेल तर रुग्ण आयर्न सप्लिमेंटचाही वापर करता येतो. आदर्श स्थितीमध्ये प्रौढांच्या शरीरामध्ये ४ ग्रॅम लोह असले पाहिजे. बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे जीवनसत्त्व एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. सोबतच यात भरपूर ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असल्याने हृदयरुग्णांसाठी फायद्याचे आहे. याशिवाय ब्ल्यू बेरीजदेखील कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठी खाता येऊ शकते. यामुळे रक्त प्रवाहदेखील चांगला राहतो.

डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असते. यातील पॉलिफेनॉल्स आणि अँथोसाइआनिन्स घटक आर्टरीज कठीण होण्यापासून बचाव करतात. डाळिंबाच्या रसाने हृदयापर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो. इतर फळांत सफरचंद चांगला पर्याय आहे. केळींमध्येही काही प्रमाणात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आढळून येते.

You might also like