Food For Liver | ‘हे’ खाल्ल्याने होणार नाही लिव्हर डॅमेज, होतील अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Food For Liver | लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो शरीरासाठी एकाच वेळी अनेक कार्य करतो. याद्वारे अन्न पचवणे, पित्त तयार करणे, संसर्गाशी लढा देणे, विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) करणे अशी कामे करते (Food For Liver). याशिवाय लिव्हरच्या मदतीने चरबी कमी होते आणि कार्बोहायड्रेट्स साठवले जाते. या अवयवात काही समस्या असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. लिव्हरसाठी एक फळ खूप महत्वाचे आहे (Amla For Healthy Liver).

 

आवळा (Indian Gooseberry) खाण्याचे फायदे

आवळ्याचा वापर सामान्यतः केस आणि त्वचेचे (Hair, Skin) आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. परंतु फॅटी लिव्हरशी (Fatty Liver) देखील तो लढतो.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवत तो अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवतो.

ज्या लोकांची पचनक्रिया (Digestion) कमजोर आहे त्यांच्यासाठी आवळा औषधापेक्षा कमी नाही.

आवळा शरीरासाठी सुपरफूडपेक्षा (Superfoods) कमी नाही, तो मधुमेह, अपचन, डोळ्यांच्या समस्या (Diabetes, Indigestion, Eye Problems) आणि लिव्हरच्या कमकुवतपणाशी लढण्याचे काम करतो.

मेंदूला बळकटी देण्यासोबतच कॅन्सरसारख्या (Cancer) घातक आजारापासूनही आपले संरक्षण करतो. (Food For Liver)

जे लोक याचे नियमित सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका कमी होतो.

लिव्हरची समस्या आवळाच्या माध्यमातून कमी करता येते. कारण लिव्हरला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यास मदत करतो.

या जादुई फळामुळे शरीरातील हायपरलिपिडेमिया आणि मेटाबॉलिक सिंड्रोम देखील कमी होते.

आवळ्याचे सेवन कसे करावे?
आवळा खाण्याचे अनेक मार्ग आहेत, सर्वात सोपा म्हणजे तुम्ही तो थेट चावून खाऊ शकता, ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे त्यांनी हे फळ काळ्या मीठासोबत खावे. याशिवाय सकाळी उठल्यावर आवळा चहा (Tea) जरूर प्यावा. काही दिवसात त्याचा परिणाम जाणवेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Food For Liver | amla indian gooseberry for fatty liver health vitamin c rich fruits immunity diabetes digestion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vinayak Mete Death | विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवे वळण, 2 गाड्यांनी पाठलाग केला होता

 

Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Maharashtra Political Crisis | ‘फोन उचलल्यावर वंदे मातरम म्हणणार नाही’ – छगन भुजबळ