टीबीचा आजार टाळण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन – जगात टीबीचे सर्वाधिक रुग्ण भारतामध्ये आहेत. येथे दरवर्षी जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू टीबीमुळे होतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आणि टीबीची शक्यता कमी करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास टीबीसारखा घातक आजार दूर ठेवणे शक्य आहे.

भरपूर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर्स असलेल्या कडधान्यांच्या सेवनाने थकवा दूर होतो. तसेच यामुळे संसर्गही होत नाही. यामुळे ऊर्जा वाढते आणि मुलांना दिल्यास त्यांचा विकासही लवकर होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि टीबीपासूनही बचाव होतो. गाजरात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्याने गाजराचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात गाजराचा रस प्यायल्याने टीबीचा संसर्ग होत नाही. गाजरामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यासाठीही उपयोग होतो.

तसेच डाळींमध्ये जीवनसत्त्वे, खनिज आणि फायबर्स असतात. डाळींमध्ये भाज्या टाकून खाणेदेखील फायद्याचे ठरते. यात कॅलरीचे प्रमाणही कमी असल्याने वजन नियंत्रित राहते. डाळींमधील अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुण असल्याने प्रतिकारशक्ती वाढते. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि लायकोपिन असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. टोमॅटोचे सूप किंवा त्याचा रस पिणेदेखील उपयोगी ठरते.

ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश केल्यास टीबीच्या संसर्गापासून बचाव होतो. अंडी देखील टीबी पासून बचाव करण्यासाठी परिणामकारक आहेत. भरपूर व्हिटॅमिन डी आणि प्रथिने अंड्यांमध्ये असल्याने टीबीपासून बचाव होतो. दररोज उकडलेली अंडी खावीत, परंतु कच्ची अंडी खाण्याचे टाळावे. उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी अंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.