Food-Medication Combination to Avoid | सावधान ! जर औषधासोबत करत असाल ‘या’ 6 गोष्टींचे सेवन तर आजच थांबवा, जाणून घ्या

नवी दिल्ली – वृत्तसंस्था : Food and Medication Combination to Avoid | मानवी जीवनात जसे चढ उतार सुरूच असतात तसे आजारपण अधून मधून येतेच. कधी कधी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली (Good Immunity) असल्यामुळे आपण आपोआप नीट होतो पण जर रोग प्रतिकारशक्ती पेक्षा आजार शक्तिशाली असला तर मात्र डॉक्टर आणि औषध हा एकच पर्याय उरतो. आजारपणात आपल्याला काही खाऊ वाटत नाही म्हणून आपण कधी कधी फक्त दूध किंवा फळांचं रस पिऊन आराम करतो. (Food-Medication Combination to Avoid)

 

अन्न-औषध परस्परसंवादाचा (Food-medication Interaction) अर्थ असा होतो की अन्नातील विशिष्ट पोषक किंवा संयुग (nutrients or compounds) तुमच्या शरीरात औषधांचे चयापचय (metabolism of medicines) करण्याच्या पद्धतीत बदल होतो आणि यामुळे तुमच्या शरीराला मिळणारा डोस कमी होतो. औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. चला जाणून घेऊयात औषध घेताना कोणत्या चुका करू नयेत. (Food and Medication Combination to Avoid)

 

 

औषधांसोबत ज्येष्ठमध पिऊ नका
काही लोक हे पचनास मदत करण्यासाठी हर्बल उपाय म्हणून वापरतात आणि काही लोक ते पदार्थ चवीनुसार वापरतात. परंतु जेष्ठमधमधील (licorice) ग्लायसिरीझिन (glycyrrhizin) हे रसायन, सायक्लोस्पोरिनसह काही औषधांचा प्रभाव कमकुवत करू शकते.

 

चॉकलेट
डार्क चॉकलेट तुम्हाचा स्वभाव शांत करण्यासाठी गुणकारी आहे. पण झोपायला लावणाऱ्या औषधांचा प्रभाव कमकुवत करू शकतो, जसे की झोलपीडेम टारट्रेट (Ambien). आणि जर तुम्ही नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरला जाणारा MAO इनहिबिटर घेत असाल, तर त्यामुळे तुमचा रक्तदाब धोकादायकरित्या वाढू शकतो.

लिंबूवर्गीय फळे (Citrus fruits)औषाधासोबत घेऊ नका
आपल्या आतड्यामधील काही पेशी आपण घेतलेल्या औषधांना आपल्या शरीराच्या इतर भागांना पोहचवण्याचा काम करतात. जेव्हा तुम्ही औषधासाठी संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय फळे खाता , तेव्हा लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेली रसायने आतड्यात प्रतिक्रिया देतात आणि औषधाचा प्रभाव कमी करतात. रसासोबत औषध सेवन केल्याने आतड्याच्या पेशी त्यांचे स्वरूप बदलतात, त्यामुळे औषधात असलेले रसायन निष्प्रभ होऊ लागते. जर तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध किंवा ऍलर्जीचे औषध ज्यूससोबत प्यायले तर तुमची समस्या वाढू शकते. लिंबूवर्गीय (Citrus) फळे ५० हून अधिक औषधांवर परिणाम करू शकतात.

 

दुधासोबत अँटीबायोटिक्स घेऊ नका
दुग्धजन्य पदार्थ शरीरात वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतात.
तुम्ही प्रतिजैविक घेत असाल आणि त्यांच्यासोबत दूध पीत असाल, तर दुधात असलेले कॅल्शियम,
मॅग्नेशियम, कॅसैन (casein Protein) औषधाची परिणामकारकता मर्यादित करू शकतात.

 

अल्कोहोल टाळा
अल्कोहोल रक्तदाब किंवा हृदयाच्या औषधाचा प्रभाव कमी करते.
तुम्ही रक्तदाब किंवा हृदयाच्या औषधांसोबत अल्कोहोल घेतल्यास औषधाचा परिणाम कमी होईल.

 

लोह पूरक
लोह पूरक गोळ्या (Iron supplements) levothyroxine (Synthroid) चे परिणाम कमी करू शकते.
हे औषध ज्या लोकांना थायरॉईड ची कमतरता आहे अशांना थायरॉईड ची गरज भागवण्यासाठी दिले जाते.
थायरॉईडचा त्रास आणि सोबत लोहची कमतरता असलेल्या लोकांनी डॉक्टरांना या बंद नक्की विचारा आणि लोग पूरक आणि औषध सोबत घेणं टाळा.

 

या गोष्टींसोबत चहा, कॉफी, व्हिटॅमिन के (vitamin k) पूरक, जास्त मिठ असलेले पदार्थ यांच्यासोबत ही औषध घेणं टाळा

 

 

Web Title :- Food-Medication Combination to Avoid | do not drink this drink when you are taking certain medications may be troublesome

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

Fish For Asthama Patient | माशांमुळे दम्याचा धोका होतो कमी, जाणून घ्या फायदे

PM JanDhan Yojana | प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत मिळताहेत 1.30 लाख रुपये; तुम्हाला फक्त करावं लागेल ‘हे’ काम