Food Poisoning | सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडले 80 जण, गावात प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

बिहार / मुंगेर : पोलीसनामा ऑनलाइन – Food Poisoning | बिहार (Bihar) राज्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी लोक भगवान सत्यनारायण (Satyanarayan Puja) पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रसाद खाल्यानंतर जवळजवळ 80 नागरिकांची तब्येत बिघडली आहे. ही घटना मुंगेर जिल्ह्यातील धरहरा भागातील नक्षलग्रस्त कोठवा गावात घडली आहे. प्रसाद खाण्यातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अधिक माहितीप्रमाणे, धरहरा भागातील कोठवा गावात राहणारे महेश कोडा (Mahesh Koda) यांच्या घरी भगवान सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूजा कार्यक्रमात दलित, महादलित आणि आदिवासी समाजातील शेकडो लोकांनीही भाग घेतला. भगवान सत्यनारायण (Satyanarayan Puja) पूजेच्या कार्यक्रमादरम्यान सर्वाना प्रसाद देण्यात आला. प्रसाद खाल्यानंतर जवळपास 80 नागरिकांची तब्येत बिघडली. प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.

प्रसाद खाल्यानंतर नागरिकांना पोटदुखी परत उलट्या झाल्या. अशी परिस्थिती बघून ग्रामीण डॉक्टरांना तातडीने बोलावून दाखविण्यात आले, परंतु, काही गावकऱ्यांची प्रकृती बिघडली असल्याने ग्रामस्थांनी लडैयाताड पोलीस (Ladaiyatad police) आणि धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राला याबाबत माहिती दिली. तर या घटनेची माहिती मिळताच लडैयाताड पोलीस ठाण्याचे पोलीस (Police of Ladaiyatad Police Station) आणि धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या टीमसह तातडीने कोठवा गावात दाखल झाले. यात तब्येत बिघडलेल्या 15 जणांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. सध्या या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : 80 people village fallen sick after eating prasad satya narayan puja munger bihar

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ? जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा