दररोजच्या पदार्थांचा कंटाळा आला असेल तर ‘हे’ हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकवेळा तेच ते पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. अशातच नवीन आणि हेल्दी पदार्थांच्या शोधात तुम्ही असला तर तुमच्यासाठी काही खास पदार्थांची रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत. हे पदार्थ तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरतात. तसेच या पदार्थाचा तुम्ही नाश्त्यामध्येही समावेश करु शकता.

1. मसालेदार आम्लंड बनाना जॅगरी केक
साहित्य
– लोणी, मीठरहित अर्धा कप
– गुळाची पावडर अर्धा कप
– दालचिनी बारीक दीड चमचा
– जायफळ बारीक 1/4 चमचा
– बदाम कापलेले अर्धा कप
– साखर 3/4 कप
– अंडी मोठी 3 नग
– संत्र्याची साल 2 चमचे
– केळी पिकलेली आणि कुस्करून 1.1/4 कप
– मैदा 3 कप
– बेकिंग पावडर 1.1/4 चमचा
– बेकिंग सोडा 1 चमचा
– ताक 2/3 कप

कृती
– 1/4 कप लोणी वितळून घ्या.
– 2 चमचे वितळलेले लोणी 8 कप पॅनमध्ये ओता.
– लोणी पॅनच्या दोन्ही बाजूंना आणि तळाला पुसून घ्या. गुळ, दालचिनी, जायफळ आणि बदाम एकत्र करा. पॅनच्या तळाला अर्धे गुळाचे मिश्रण भुरभुरा. उर्वरित मिश्रण वितळलेल्या लोण्यासोबत एकत्र करा. बाजूला ठेवा.
– मोठ्या बाऊलमध्ये उर्वरित 1/4 कप लोणी बारीक केलेल्या साखरेसोबत मिश्रित होईपर्यंत लावा. अंडी फेटून घ्या. एका वेळी एक अशा रितीने फेटून होईपर्यंत. कुस्करलेली केळी फेटून घ्या.
– मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि मीठ मिश्रण करा. केळ्याचे मिश्रण ताक, ब्लेंड होईपर्यंत हलवा.
– अर्धे मिश्रण तयार केलेल्या पॅनमध्ये ओता. उर्वरित गूळ साखरेचे मिश्रण समानपणे वर घाला. उर्वरित मिश्रणाने झाका.
– लांब लाकडी काठी केकेमधे घातल्यास स्वच्छ होईपर्यंत 180 अंश ओव्हनवर सुमारे 50 मिनिटे भाजा. केक रॅकवर 5 मिनिटे थंड करा. मग केक सर्व्हिंग प्लेटमध्ये घ्या. केक गरम किंवा थंड वाढा.

2. आम्लंड अँड होली बेसिल ठंडाई
साहित्य
– बदाम भिजवून साल खाडलेले 2 चमचे
– भिजवलेल्या कलिंगडाच्या बिया 2 चमचे
– भिजवलेली खसखस 1 चमचा
– आम्लंड स्लिव्हर्स अर्धा कप
– साखर 1/4 कप
– केशर काडी चिमूटभर
– तुळशीचे पाने 4 नग
– दूध 2 कप
– हिरवी वेलची पावडर 1/2 चमचा
– काळी मिरी 1/2 चमचा
– भिजवलेले फेनेल दाणे 1/4 कप
कृती
– बडिशेप, खसखस आणि बदामाची मऊ पेस्ट बनवून घ्या.
– जड बुडाच्या पॅनमध्ये दूध आणि केशर काड्या उकळून घ्या. साखर दुधात विरघळून घ्या.
– ताजी तुळशीची पाने आणि काळीमिरी पेस्ट करून दुधात मिसळा.
– बदाम, खसखस आणि बेडिशेपची पेस्ट वेलची पावडर आणि बदामाच्या तुकड्यांसह दुधात मिसळा आणि 2-3 मिनिटे उकळून द्या.
– ठंडाई फ्रिजमध्ये ठेवा.