’हे’ 5 पदार्थ कधीच होत नाहीत खराब ? वर्षानुवर्षे खाऊ शकता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुतांश खाद्यपदार्थ हे लवकर खराब होतात. यामध्ये शिजवलेले आणि बिन शिजवलेले पदार्थ सुद्धा काही कालावधीत खराब होतात. म्हणून या पदार्थांची एक्सपायरी डेट ठरलेली असते. त्यांच्या पाकिटावरही ती लिहिली जाते. परंतु, असेही काही पदार्थ आहेत जे कधीच खराब होत नाहीत, आणि ते तुम्ही वर्षानुवर्ष खाऊ शकता. मात्र, यासाठी त्यांची साठवणूक योग्यपद्धतीने करावी लागते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.

1 मीठ – यास शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराइड म्हणतात. ते कधीही एक्सपायर होत नाही. म्हणूनच साठवणीच्या अनेक पदार्थांमध्ये ते जास्त वापरले जाते. मिठामुळे पदार्थांमधील आर्द्रता कमी होते आणि ते टिकतात. परंतु, मिठात आयोडिन मिसळले तर ते पाच वर्षांपर्यंत टिकते.

2 साखर – साखर टिकावू असल्यानेच जाम-जेलीसारख्या विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. परंतु पीठीसाखर खराब होऊ शकते. यासाठी ती हवाबंद डब्यात ठेवतात.

3 राजमा – राजमा, सोया हेदेखील 30 वर्षांपर्यंत खराब होत नाहीत. यातील पोषक घटक कायम राहतात.

4 पांढरा तांदूळ – हवाबंद डब्यात, 40 डिग्री फॅरनहाइड तापमानावर तांदूळ 30 वर्षांपर्यंत टिकतात. त्यातील पोषक घटकांवर सुद्धा काहीही परिणाम होत नाही, असे अमेरिकेतील उटाह स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधनात आढळून आले आहे.

5 मध – मध कधीही खराब होत नाही. फुलांच्या रसापासून मध तयार होत असताना मध्यमाशांच्या एन्झाइम्सशी प्रतिक्रिया होते. मध जर काचेच्या बरणीत नीट बंद करून ठेवले तर ते कधीच खराब होत नाही.