Foods For Hair | उन्हाळ्यात केस तुटणे-गळणे होईल बंद ! आजपासूनच खायला सुरूवात करा ‘या’ दोन गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Foods For Hair | उन्हाळी हंगाम आला आहे. या ऋतूतील प्रखर सूर्यप्रकाश (Sunlight) आणि गरम हवा (Hot Air) यांचाही केसांवर खूप वाईट परिणाम होतो. या ऋतूत केस कोरडे (Hair Dry) आणि निर्जीव होतात, त्यामुळे केस अधिक गळू (Hair Fall) लागतात. यामुळेच ऋतू बदलत असताना केसांची जास्त काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ देतात (Foods For Hair).

 

केस गळणे आणि तुटणे टाळण्यासाठी बहुतेक लोक इंटरनेटवर शोध घेतात आणि तेथे नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करतात. पण केस गळण्याच्या समस्येवर जर एखाद्याने आपल्या आहाराकडे (Diet) आणि जीवनशैलीकडे (Lifestyle) लक्ष दिले तर ही समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते.

 

चांगले खाणे म्हणजे निरोगी आणि संतुलित आहार घ्यावा, ज्यामध्ये पुरेसे पोषण, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स (Nutrition, Vitamins, Minerals And Anti-oxidants) असलेले पदार्थ असतात, असे केल्याने केसांना आतून पोषण मिळते आणि केसांच्या समस्यांपासून (Hair Problems) आराम मिळतो. तसेच केसांच्या आरोग्यासाठी तज्ञ कोणते पोषक आणि जीवनसत्त्वे आहारात घेण्याचा सल्ला देतात हे जाणून घ्या (Foods For Hair).

 

1. व्हिटॅमिन बी (Vitamin B)
अनेक जीवनसत्त्वे बी-व्हिटॅमिनच्या अंतर्गत येतात. जसे की B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 ही सर्व B जीवनसत्त्वे पाण्यात विरघळणारी आहेत. हे सर्व बी-व्हिटॅमिन केसांपर्यंत ऑक्सिजन (Oxygen) वाहून नेतात, पोषण आणि केसांची वाढ प्रदान करतात.

 

त्यामुळे बी-व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचे सेवन केसांच्या वाढीसाठी चांगले असते. यासाठी धान्य, शेंगा, केळी, अंडी, दूध, मांस, पालेभाज्या (Cereals, Legumes, Banana, Eggs, Milk, Meat, Leafy Vegetables) इत्यादी खा.

2. व्हिटॅमिन ई (Vitamin E)
केसांसाठी व्हिटॅमिन ई सर्वात महत्वाचे मानले जाते. हे केसांच्या वाढीस चालना देते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल (Vitamin E Capsule) देखील बाजारात उपलब्ध आहेत, परंतु फक्त पदार्थांमधूनच व्हिटॅमिन ई घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांमध्ये तृणधान्ये, मांस, अंडी, फळे (Fruits), भाज्या, बदाम इ. चा समावेश होतो.

 

3. व्हिटॅमिन सी (Vitamin C)
व्हिटॅमिन सी देखील पाण्यात विरघळणारे आहे. हे कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक आहे, जे केसांचे आरोग्य चांगले ठेवते. व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यासाठी लिंबू, संत्री, आवळा (Lemon, Orange, Amla) इत्यादी आंबट फळांचे (Sour Fruits) सेवन करता येते.

 

4. व्हिटॅमिन ए (Vitamin A)
व्हिटॅमिन ए केसांना आर्द्रता देण्याचे काम करते आणि त्याच वेळी केसांच्या वाढीस मदत करते.
त्यामुळे व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांमध्ये गाजर, दूध, टोमॅटो, रताळे, टरबूज, लाल सिमला मिरची
(Carrot, Tomato, Sweet Potato, Watermelon, Red Shimla Chilli), अंडी, मासे इ. चा समावेश होतो.

 

5. प्रोटीन (Protein)
केस हे प्रोटीनचे बनलेले असतात हे तुम्हाला माहीत असेलच. म्हणजेच पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेतल्यास केसांची वाढ चांगली होते,
तसेच त्यांची गळती आणि कोरडेपणाही कमी होतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी अंडी, मांसाहारी, चीज, टोफू, बदाम, काजू, डाळ
(Non-vegetarian, Cheese, Tofu, Almond, Cashew) आदी प्रोटीनयुक्त पदार्थ आहारात घ्यावेत.

6. आयर्न (Iron)
तज्ज्ञ सांगतात की केस गळण्याचे मुख्य कारण शरीरात आयर्नची कमतरता (Iron Deficiency) असू शकते.
त्यामुळे आयर्नयुक्त अन्नाचे सेवन करावे. आयर्नयुक्त पदार्थांमध्ये पालक, बीन्स, वाटाणे (Spinach, Beans, Peas), शेंगा इत्यादींचा समावेश होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Foods For Hair | foods to prevent hairfall vitamins rich nutrient foods for healthy hair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

 

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

 

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’