×
Homeआरोग्यFoods For Long Life | 'या' 2 गोष्टी खाल्ल्याने कमी होत आहे...

Foods For Long Life | ‘या’ 2 गोष्टी खाल्ल्याने कमी होत आहे तुमचे वय, शाकाहारींनी आवश्यक द्यावे लक्ष; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Foods For Long Life | निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, लोक सर्वकाही करतात जेणेकरून ते त्यांची रोजची कामे सहज करू शकतील. यासाठी सकाळी उठून गरम पाणी पिणे (Drink Hot Water), रात्री जेवल्यानंतर चालणे (Walk After Dinner) आदी कामे करत असतात (Foods For Long Life). पण तज्ज्ञ सांगतात की निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात जास्त मदत करणारी गोष्ट म्हणजे ’डाएट’ (Diet).

 

जर कोणी सकस आहार (Healthy Diet) घेत असेल तर तो निरोगी आणि तंदुरुस्त राहतो, तर अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि शरीरात अनेक आजार होतात. आजारांनी घेरल्यावर लोकांचे आयुष्य हळूहळू कमी होत जाते.

 

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की जे लोक त्यांच्या आहारात रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट ऐवजी डाळी (Pulses), हिरव्या भाज्या (Green Vegetables), नट (Nuts) इत्यादींचा समावेश करतात, ते 13 वर्षे अधिक जगू शकतात. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने या पदार्थांचा आहारात समावेश केला तर तो 3 ते 8 वर्षे अधिक जगू शकतो. (Foods For Long Life)

 

काय सांगते संशोधन
PLOS मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रेड आणि प्रोसेस्ड मीटपेक्षा आहारात धान्य (Cereals), शेंगा (Legumes) आणि नट्सचा समावेश करणे हा आयुष्य वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. नॉर्वेमध्ये केलेल्या संशोधनानुसार, परदेशात राहणारे लोक त्यांच्या आहारात कमी किंवा नाहीच्या बरोबरो सुका मेवा (Dried Nuts), शेंगा, फळे (Fruits) आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करतात.

 

पाश्चात्य संस्कृतीत जे अन्न आहे, त्यात भरपूर प्रक्रिया केलेले अन्न किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ, रेड मीट आणि दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. अशा अन्नामुळे लठ्ठपणा (Obesity), मधुमेह (Diabetes), कर्करोग (Cancer) असे अनेक आजार होऊ शकतात, ज्यामुळे वय कमी होऊ लागते.

संशोधनानंतर तज्ज्ञांनी सांगितले की, जर परदेशात राहणार्‍या लोकांनीही चांगला आहार घेतला आणि आहारात धान्य, शेंगा आणि काजू इत्यादींचा समावेश केला तर ते खराब आहार घेणार्‍यांपेक्षा 13 वर्षे जास्त जगू शकतात.

 

बर्गन युनिव्हर्सिटी (University of Bergen) च्या लोकांना असे आढळून आले की जर 60 वर्षांच्या व्यक्तीने आहारात या पदार्थांचा समावेश केला
तर त्यांचे देखील आयुष्य सुमारे 8.5 वर्षांनी वाढू शकते. दुसरीकडे, जर 80 वर्षांच्या व्यक्तीने या पदार्थांचा आहारात समावेश केला
तर तो त्याचे आयुष्य 3.5 वर्षांनी वाढवू शकतो.

 

225 ग्रॅम तृणधान्ये आणि 25 ग्रॅम सुकी फळे
संशोधनात, ठराविक युरोपियन आणि अमेरिकन आहारांची तुलना संगणकाद्वारे केली गेली,
ज्यात वय आणि अन्न सेवन यांच्याशी संबंधित आरोग्य धोक्याची गणना केली गेली.
संशोधकांनी सांगितले की, जर 20 वर्षांची व्यक्ती बीन्सचे सेवन करत असेल.
एका दिवसात 200 ग्रॅम शेंगा, एक वाटी डाळीचे सेवन केले तर त्याचे आयुष्य सुमारे 2.5 वर्षांपर्यंत वाढू शकते.

 

त्यांच्या मते, शेंगांमध्ये चरबी फार कमी प्रमाणात आढळते, परंतु प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप जास्त प्रमाणात आढळतात.
म्हणून, जर एखाद्याला त्याचे वय वाढवायचे असेल तर त्याने दररोज सुमारे 25 ग्रॅम काजू आणि सुमारे 225 ग्रॅम धान्य उत्पादन जसे
की ओटमील (Oatmeal), ब्राऊन राइस (Brown Rice) इत्यादींचे सेवन केले पाहिजे.

रेड आणि प्रोसेस्ड मीट टाळा (Avoid Red And Processed Meats)
यासोबतच तज्ज्ञांनी सांगितले की, रेड आणि प्रोसेस्ड मांस खाणे बंद केले पाहिजे, कारण त्यात चरबी आणि मीठ जास्त प्रमाणात आढळते.
जर तुम्ही ते पूर्णपणे खाणे बंद केले तर तुम्ही आणखी 4 वर्षे जगू शकता.
आहारातील या बदलामुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त फरक दिसला. याचे कारण काय आहे हे त्यांनी सांगितलेले नाही.

 

या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि पोषण तज्ज्ञ प्रोफेसर लार्स फॅडनेस (Lars Fadnes) म्हणाले
की, आहाराचे कॅलक्युलेशन केल्यास लोकांना चांगले खाण्यास मदत होऊ शकते.
कॅल्क्युलेशन आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम अन्न निवडण्यात मदत करू शकते.

 

Web Title :- Foods For Long Life | foods for long life avoid red and processed meat for live longer and eat a diet rich in legumes lentils and nuts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gajanan Marne Gang | कुख्यात गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून वर्षभरात 56 जणांवर MPDA

 

Chandrakant Patil | ‘या’ तारखेनंतर महाविकास आघाडीची सत्ता जाणार – चंद्रकांत पाटलांचे भाकीत

 

CM Uddhav Thackeray | ‘थप्पड से डर नही लगता प्यार से लगता है’; CM उद्धव ठाकरेंची चौफेर टोलेबाजी

Must Read
Related News