Foods For Strong Bones | हाडे मजबूत करण्यासाठी सेवन करा ‘या’ 9 गोष्टी, वृद्धत्वात होणार नाही अडचण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Foods For Strong Bones | उत्तम आरोग्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहार (Diet). तुमचा आहार, चांगली झोप (Good Sleep) आणि व्यायाम (Exercise) या सर्व गोष्टी मिळून शरीर आतून (Foods For Strong Bones) आणि बाहेरून मजबूत बनतात. यामुळे तुम्ही केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही फिट राहता (Items To Strengthen Bones).

 

न्यूट्रिशनिस्ट भक्ती कपूर (Nutritionist Bhakti Kapoor) ने इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post) द्वारे असे काही खाद्यपदार्थ सांगितले आहेत जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. कॅप्शनमध्ये भक्तीने लिहिले आहे की, संतुलित आहार (Balanced Diet) आणि निरोगी जीवनशैली (Healthy Lifestyle) मिळून हाडे मजबूत होतात. लहानपणापासून त्याचे पालन केल्याने म्हातारपणात हाडे मजबूत (Foods For Strong Bones) राहतात.

 

शरीरासाठी आवश्यक 9 पदार्थ (9 Essential Nutrients) –
भक्ती कपूरने 9 आवश्यक खाद्यपदार्थांची यादी तयार केली आहे जे हाडे निरोगी ठेवण्यासाठी काम करतात. या महत्त्वाच्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया.

 

1. बदाम / Almonds

2. पालेभाज्या / Leafy Vegetables

3. फॅटी फिश / Fatty Fish

4. दही / Yogurt

5. ऑलिव्ह तेल / Olive Oil

6. केळी / Bananas

7. संत्री / Orange

8. तीळ / Sesame

9. सोया / Soya

या खाद्यपदार्थांसोबतच भक्तीने हाडांच्या काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. तिने लिहिले आहे की, धान्ये कॅल्शियमचा चांगला स्रोत नाहीत कारण त्यात फायटिक अ‍ॅसिड (Phytic Acid) असते. ते कॅल्शियमचे गुणधर्म नष्ट करते. मटण (Mutton) आणि चिकन (Chicken) सारख्या अनेक अ‍ॅनिमल प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये शरीरात कॅल्शियमची कमतरता असते.

 

त्यामुळे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तयार खाद्यपदार्थांमध्ये भरपूर मीठ (Salt) आढळते आणि ते शरीरातून कॅल्शियम (Calcium) काढून टाकते. त्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण (Salt Level) संतुलित ठेवणे आवश्यक आहे.

 

भक्तीने पुढे लिहिले की, अति दारू (Alcohol) प्यायल्याने ऑस्टिओपोरोसिसचा (Osteoporosis) धोका वाढू शकतो. त्यामुळे दारूचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. चहा (Tea) आणि कॉफीमध्ये (Coffee) आढळणार्‍या कॅफीनमुळे कॅल्शियमची हानी होते, त्यामुळे चहा किंवा कॉफीचे अतिसेवन टाळावे. याशिवाय पोषणतज्ञ शारीरिक हालचाली आणि व्हिटॅमिन डी 3 (Vitamin D3) घेण्याची शिफारस करतात.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Foods For Strong Bones | foods for strong bones eat these foods for bones health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘माझे प्रश्न कोणी बदलले हे…’; पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत फडणवीसांचा खळबळजनक दावा !

 

Sleepiness After Lunch | दुपारच्या जेवणानंतर ताबडतोब झोप येते का? जाणून घ्या किती धोकादायक ठरू शकते ‘ही’ सवय

 

LIC Kanyadan Policy Fact Check | तुम्ही सुद्धा खरेदी केली का LIC ची ’कन्यादान’ पॉलिसी, जाणून घ्या सत्य अन्यथा बुडतील पैसे