‘या’ घरगुती पदार्थांनी टिकवून ठेवा हाडांची मजबुती 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जसं वय वाढत जातं तसे अनेकांनामध्ये हाडांच्या समस्या वाढत जातात. वाढत्या वयानुसार सांधेदुखी, हाडांची झीज, हाड फ्रॅक्चर होणं या समस्या उद्भवत.वाढत्या वयासोबत गरजेचं असत अशा समस्यांपासून स्वतःला दूर ठेवणं. त्यासाठी आवश्यक असते हाडांची मजबुती आणि हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक कॅल्शिअम. जर आपल्या शरीराला कॅल्शिअम कमी पडलं तर या समस्या होऊ शकतात. त्यामुळे रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा ज्यामध्ये कॅल्शिअम असते. तर कोणत्या पदार्थामधून तुम्हाला हे कॅल्शिअम मिळेल ते जाणून घेऊया.

दूध –
अनेकांना दूध आवडत नाही पण शरीराला कॅल्शिअम मिळवून देणारा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे शरीराला कॅल्शिअम हवं असल्यास दूध जरूर प्यावं. एक कप दुधाच्या सेवनानं आहारातील शरीराला आवश्यक ३० टक्के घटक मिळतात. शिवाय काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’देखील असतं, ज्यामुळे कॅल्शिअम शरीरात योग्यप्रकारे शोषलं जातं.

हिरव्या भाज्या आणि पालेभाज्या –
पालेभाज्या आणि कोबी, भेंडी यांसारख्या भाज्यांमध्येही हाडांसाठी आवश्यक असलेलं कॅल्शिअम असतं. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात सूप किंवा सलाडमध्ये अशा भाज्यांचा समावेश नक्की करावा.

बदाम –
बदाम विविध आरोग्य समस्यांना दूर तर ठेवतच पण शरीराला कॅल्शिअम मिळून देणारे आणखी एक मुख्य स्रोत सुद्धा आहे. बदामात कॅल्शिअमसह असे अजून काही घटक असतात जे तुम्हाला इतर समस्यांपासून दूर ठेवते.

चीझ –
चीझ प्रत्येकालाच आवडतं. हेच चीझ हाडांसाठीही फायदेशीर आहे. चीझमध्ये कॅल्शिअम असतं. त्यामुळे शरीराला दररोज लागणारे ३० टक्के कॅलरीज यातून मिळतात. मात्र हे चीझ जरी आवडत असलं तरी हे प्रमाणातच खावं.