Foods That Trigger Migraine | गोड पदार्थ आणि चॉकलेटने वाढते मायग्रेनची वेदना, ‘या’ 8 गोष्टींपासून रहा दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Foods That Trigger Migraine | मायग्रेन (Migraine) ही एक समस्या आहे जी आपल्या खराब जीवनशैली आणि आहारामुळे उद्भवते (Trigger). वास्तविक, आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. मायग्रेनच्या समस्येमध्ये अन्नाचाही मोठा वाटा असतो. मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे ज्यामध्ये उलट्या होणे, अस्वस्थता, प्रकाश आणि मोठ्या आवाजाची संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्तीच्या पलिकडे जाते. (Foods That Trigger Migraine)

 

मेडटेकनुसार, हा एक प्रकारचा मेंदू विकार असून जो 35 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये वेगाने विकसित होतो. डब्ल्यूएचओच्या मते, हा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो जो मुख्यतः हार्मोनल प्रभावामुळे होतो. OnlyMyHealth नुसार, असे काही पदार्थ आहेत जे मायग्रेनला चालना देतात. या पदार्थांपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या टाळता येऊ शकते.

 

मायग्रेनला चालना देणारे पदार्थ

1. कॅफिनयुक्त पेये (Caffeinated Beverages)
अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनच्या मते, कॅफीन मायग्रेन अटॅक टाळण्यास मदत करू शकते. पण जर तुम्ही चहा, कॉफी यासारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळे मायग्रेनची समस्याही वाढू शकते.

 

2. आर्टिफिशियल स्वीटनर्स (Artificial Sweeteners)
बाजारात अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध आहेत ज्यात कृत्रिम गोडवा वापरला जातो. अशा पदार्थांचा आहारात सतत समावेश केल्याने मायग्रेनची समस्या वाढू शकते. (Foods That Trigger Migraine)

 

3. चॉकलेट (Chocolate)
चॉकलेटमध्ये कॅफिन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढू शकते.

 

4. मोनोसोडियम ग्लुटामेट (Monosodium Glutamate)
मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) ग्लुटामिक अ‍ॅसिड हे एक सोडियम मीठ आहे ज्याचे जास्त सेवन केल्याने ही समस्या उद्भवू शकते. हे पॅके केलेले पदार्थ, चायनीज पदार्थ, पॅके केलेले सूप इत्यादींमध्ये आढळते.

5. मांस (Meat)
मांस, हॅम, हॉट डॉग आणि सॉसेज यांसारख्या पदार्थांमध्ये नायट्रेट्स नावाचा पदार्थ असतो जो रंग आणि चव वाढवण्याचे काम करतो. हे पदार्थ रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईड सोडू शकतात ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या पातळ करते ज्यामुळे मायग्रेनला चालना मिळते.


6. लोणचे आणि फर्मेटेड फूड्स (Pickles And Fermented Foods)
जर तुम्ही लोणचे, फर्मेटेड फूड्स आणि मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
अशा खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात टायरामाइन असू शकते ज्यामुळे मायग्रेन होऊ शकते.

 

7. फ्रोजन फूड्स (Frozen Foods)
आईस्क्रीम, पॅक केलेले फास्ट फूड इत्यादींचे सेवन केल्याने देखील मायग्रेन होऊ शकतो.

 

8. सॉल्टी फूड (Salty food)
मीठयुक्त प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
त्यामध्ये उच्च प्रमाणात सोडियम असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि मायग्रेन अटॅक येऊ शकतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Foods That Trigger Migraine

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

 

Pune Crime | वृद्धापकाळात आधारासाठी ‘स्थळ’ पाहणार्‍या 81 वर्षाच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याची फसवणूक; विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

 

Pune Crime | अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला 1 लाखांचा घातला गंडा; खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना