Foods To Avoid During COVID : कोरोनातून बरे होताना ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका; बरे होण्यासाठी लागू शकतो वेळ

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढत होताना दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. मात्र, कोरोना रिकव्हरी पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही वेगाने बरे होऊ शकता.

रिकव्हरी काळात या पदार्थांचे करा सेवन…

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले, की रिकव्हरी पिरियडमध्ये तुमचे खाणे हलके असावे. मात्र, पोषणने पुरेपूर्ण असे असावे. जेवण असे असावे, की ज्यामध्ये व्हिटॅमिन C, D मिनरल्स आणि झिंक असेल. त्यामुळे तुम्ही वेगाने रिकव्हर होऊ शकाल. पौष्टिक खिचडी ही सर्वात चांगला पर्याय आहे. खिचडीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हिरव्या भाज्यांसह खिचडी अगदी सहज पचवता येऊ शकते. यामुळे आतून उर्जा आणि शक्ती मिळते. तुम्ही जे काही खाल ते गरमच खा. थंड काहीही खाऊ नका. तुम्ही वेगाने रिकव्हर होऊ शकाल.

याचे सेवन करणे टाळावे…

– पॅकेज्ड फूड भूक मिटवण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. मात्र, कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी हेच फूड तुम्हाला भारी पडू शकते. पॅकेज्ड फूडमध्ये सोडियम आणि प्रिजर्वेटिव्स् अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात सूज येते. रिकव्हरीला जास्त वेळ लागू शकतो. हे फूड इम्यून सिस्टिलाही कमजोर करू शकते.

– कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर चव आणि वास येणे बंद होत असते. त्यामुळे काहीतरी वेगळे खावेसे वाटते. पण तळलेले पदार्थ खाणे टाळावे. तुम्ही आपल्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

– कोरोनातून बरे होत असताना सोडा पिणे यांसारखे पदार्थ टाळावे. हे ड्रिंक्स सूज निर्माण करू शकतात. त्यामुळे ठीक होण्यास विलंब लागू शकतो. त्याऐवजी लिंबू पाणी प्यावे. लिंबू पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि इम्युनिटी वाढते. त्यामुळे रिकव्हर होण्यास मदत मिळते.