चहा-कॉफीसह ‘हे’ 6 पदार्थ औषधांसोबत कधीच खाऊ नका ! जाणून घ्या सविस्तर माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्ही आजारी असाल तर डॉक्टर तुम्हाला काही आहारासंदर्भातील तथ्यही सांगत असतात आणि लवकर बरं होण्यासाठी औषधंही लिहून देत असतात. औषधांचं सेवन करताना आपण अनेकदा असे काही पदार्थ खातो किंवा पितो ज्यानं आपल्याला हानी होते. याचबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

1) चहा-कॉफी – जर तुम्ही चहा, कॉफी किंवा कोणत्याही गरम पेयासोबत औषधांचं सेवन करत असाल तर याचा योग्य तो फायदा मिळत नाही. त्यामुळं असं काही करणं टाळावं. औषधं कायम थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबतच घ्यावीत.

2) आंबट फळं –आंबट फळं 50 पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. त्यामुळं जर तुम्ही औषध घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्षं, लोणचं, चिंच असे पदार्थ खाणं टाळा. यानं शरीरात अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.

3) केळी – जर तुम्ही कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन अशी काही ब्लड प्रेशरची औषधं घेत असाल तर केळी किंवा जास्त पोटॅशियम असणारी फळं खाऊ नयेत. यानं हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळं असं काही करणं टाळावं.

4) डेअरी प्रॉडक्ट्स – दूध, दही, पनीर मलाई असे डेअरीमधील पदार्थ शरीरातील अँटीबायोटीक औषधांचा प्रभाव शुन्य करू शकतात. दुधातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांची प्रोटीनसोबत काही रिअ‍ॅक्शन होते. यानं औषधांचा प्रभाव कमी होतो.

5) अल्कोहोल –अल्कोहोलसोबत औषधाचं कधीच सेवन करू नये. कारण यानं जीवाला धोका निर्माण होतो. कारण औषधांमधील केमिकल्सची आणि अल्कोहोलची रिअ‍ॅक्शन होते.

6) सोडा किंवा कोल्डड्रींक्स – सोडा किंवा कोल्डड्रींक्ससोबत औषधं घेण्याची चूक तर कधीच करू नका. कारण यामुळं खूप मोठं नुकसान होऊ शकतं.