रुचकर … पुणेकरांना खुणावतीय चॉकलेट राखी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

येत्या २६ तारखेला रक्षाबंधनाचा सण  आहे . हा सण  सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . याकरिता सर्वत्र दरवर्षीप्रमाणे  रंगीत दोरा ,रेशीम, मणी खडे रुद्राक्ष आशा नानाविध राख्यानी बाजारपेठ सजली आहे. मात्र यंदा पुण्यात चक्क खाता येणाऱ्या राखीची क्रेझ आहे. पुण्यात यंदा चॉकलेट राखी बाजारामध्ये उपलब्ध झाली आहे. एरव्ही  सुपरमॅन, स्पायडरमॅन, परी, बॅट-बॉल, लाईट असलेल्या अशा विविध राख्या म्हणजे बच्चेकंपनी साठी पर्वणी असते . मात्र यंदा चॉकलेट च्या राखीमुळे बच्चे कंपनी खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.
[amazon_link asins=’B073WVWL6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e646c318-a82a-11e8-8cf9-4f646eefea7c’]
रक्षाबंधन करिता अगदी दोन रुपयांपासून ते सोने, चांदी आणि हिऱ्याच्या राख्याही घेतल्या जातात.यात थोडासा बदल म्हणून खाता येतील अशा चॉकलेटच्या राख्याही नव्याने आल्या आहेत. चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत असल्यामुळे या राख्यांना उत्तम  प्रतिसाद मिळत आहे.

[amazon_link asins=’B073TCT6X6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efcccfd2-a82a-11e8-b269-d395f70ab8af’]
न वितळणारे चॉकलेट

साधारणपणे  चॉकलेट हे गरम झाल्यास वितळते पण या राखीकरिता  वापरण्यात आलेले चॉकलेट राख्या चार ते पाच दिवस उत्तम स्थितीत फ्रिजशिवाय टिकतात. भाऊ-बहीण अर्धीअर्धी करून वरचे चॉकलेट खाऊ शकतात. इतकेच नव्हे तर वरचे चॉकलेट खाल्ल्यावर उर्वरित राखी नेहमीच्या राखीप्रमाणे हवी तितके दिवस हातावर ठेवता येते. याबाबत चॉकलेट राखीची निर्मिती करणारे विक्रम मूर्थी म्हणाले की, गेले तीन वर्ष मी या संकल्पनेवर काम करत आहे. यंदा प्रथमच हव्या तशा राख्या बनल्या असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे.