‘खुरूप’ म्हणजे काय ? जाणून घ्या याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम

खुरूप म्हणजे काय ?

खुरूप किंवा कॉर्न म्हणजेच अशी जागा जिथली त्वचा ही सततच्या घर्षणामुळं किंवा प्रेशर वाढल्यामुळं जाड होते. पायांची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं किंवा योग्य फिटींग असणारी पादत्राणे न घातल्यानं ही समस्या येते. भारतातील संख्याशास्त्रानुसार जनसंख्येच्या एकूण 10.65 कोटी लोकांमधून 2.6 कोटी लोकांना ही समस्या येते.

काय आहेत याची लक्षणं ?

याची लक्षणं केवळ प्रभावित जागेवरच दिसतात. ही लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत –

– त्वचा कठिण किंवा कडक होणे
– प्रभावित जागा कोनासारखी किंवा शंकूसारखी गोल होणे
– दुखणं
– प्रभावित जागेवर पांढरा, पिवळा किंवा ग्रे कलरचा डाग पडतो.
– चालताना त्रास होणं

काय आहेत याची कारणं ?

– योग्य फिटींगची पादत्राणे न घालणं
– चपलेचं सोल वारंवार पायच्या त्वचेला घासणं
– उचं टाचेच्या जोड्यांमुळं पायांवर दाब येतो आणि ही स्थिती आणखी खराब होते.
– पायातील असामान्यत्व जसे की, हॅमर किंवा पंजाच्या आकाराची बोटं असल्यानंदेखील खुरूप होऊ शकतं.

काय आहेत यावरील उपचार ?

– प्रभावित त्वचा खरवडून काढली जाते.
– यासाठी खूप मोठ्या वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज नसते. फक्त पायाच्या त्वचेचं कमी घर्षण होईल एवढीच काळजी घ्या.
– वेदना कमी होण्यासाठी औषधं दिल्यानंही आराम मिळतो.

काळजी घेण्यासाठी काही टीप्स –

– पायची त्वचा आणि सोल किंवा चपलेचं घर्षण कमी करण्यासाठी घट्ट पादत्राणं वापरणं टाळा
– नेहमी आरामदायक पादत्राणंव वापरावीत.
– कुठेही अनवाणी जाणं टाळावं.
– पायाची बोटं प्रभावित जागेत लोकरीचा वापर करावा. यामुळं आराम मिळतो.
– गरम पाण्याच्या टबमध्ये 20 मिनिट पाय ठेवून ते प्युमिक स्टोननं घासावेत.
– कुरूपच्या जागेवर आणि आजूबाजूला क्रीम लावावी. यामुळं त्वचा सॉफ्ट व्हायला मदत होते.
– कुरूपाची व्यवस्थिता काळजी घेतली तर तो आरामात बरा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.