धक्कादायक ! Live सामन्यात चाहत्याची तिसऱ्या मजल्यावरून उडी (व्हिडीओ)

साऊ पाऊलो : वृत्तसंस्था – फुटबॉल मैदानावर सामन्यादरम्यान अनेक घटना पहायला मिळतात. फुटबॉलचा चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी अनेक चाहते मैदानावर हजर असतात. अटीतटीच्या लढतीमध्ये आपल्या संघाचा पराभव काही चाहत्यांना सहन होत नाही. असाच एक प्रकार ब्राझीलच्या मोरांबी स्टेडियमवर घडला आहे. याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याही अंगावर शहारे उभे राहतील. मोरंबो मैदानावर साऊ पाऊलो आणि ग्रेमियो यांच्यात झालेल्या सामान्यात एका चाहत्याने तब्बल 40 फूटावरून खाली उडी मारली.

40 फूट ऊंचीवरून उडी मारणाऱ्या 23 वर्षीय चाहत्याचे नाव रियोस डे मिलो असे आहे. त्याने 40 फुटावरून उडी मारल्यानंतर तो खाली असलेल्या दोन जणांवर पडला. यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. एवढ्या उंचीवरून उडी मारली तरी सुदैवाने त्याच्यासह 13 वर्षाची मुलगी यामध्ये किरकोळ जखमी झाली. रोयोस याच्या पायाला दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रियोस याने 40 फुटावरून मारलेल्या उडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा प्रकार त्याच्या प्रेयसीने इंटरनेटवर पाहिल्यानंतर त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. रियोसची आई लिलियननं एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे आम्ही खुप घाबरलो होतो. मात्र, तो जिवंत असल्याचे कळल्यानंतर आमच्या जीवात जीव आहे. एवढ्या उंचीवरून पडल्यानंतर आम्ही आमचा मुलगा गमवला असेच वाटले होते. मात्र, माझ्या मुलाने मृत्यूवरही मात केल्याचा आनंद होत आहे. रम्यान रियासनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला ढकलण्यात आले याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like