जगातील दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो झाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील दिग्गज फुटबॉलपटू पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडला आहे. मंगळवारी त्याचा कोविड अहवाल सकारात्मक झाला. आता दिग्गज फुटबॉलरला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन रहावे लागेल. यासह तो स्वीडनविरुद्धच्या नेशन्स लीग सामन्यातूनही बाहेर पडला आहे.

पोर्तुगालच्या फुटबॉल महासंघानेही रोनाल्डोच्या कोरोना संक्रमित होण्याची पुष्टी केली आहे. महासंघाने एक निवेदन जारी करत म्हंटले कि, कोरोनाच्या कचाट्यात सापडल्यानंतर रोनाल्डो नॅशनल टीमबरोबर प्रशिक्षणापासून मागे हटला आहे.

महासंघाने म्हटले की, रोनाल्डोमध्ये लक्षणे दिसून आली आणि तो आयसोलेट झाला. रोनाल्डोने गेल्या आठवड्यात पोर्तुगालसाठी स्पेनविरुद्ध मैत्रीपूर्ण खेळी केली होती, तर रविवारी तो लीग ऑफ नेशन्समध्ये फ्रान्सविरुद्ध मैदानात उतरला होता.