#Video : अबब .. रोनाल्डोची एक कार विराटच्या सगळ्या कारच्या किमतीपेक्षाही महाग !

लंडन : वृत्तसंस्था – भारतीय संघ सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये विश्वकप स्पर्धा खेळत असून भारतीय संघात सध्या अनेक खेळाडू करोडपती आहेत, मात्र सध्या चर्चा सुरु आहे ती दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारची आणि त्याच्या किमतीची. सध्याच्या घडीला भारतीय संघात सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय खेळाडू असलेला विराट कोहलीला टक्कर देण्याचे काम तो करत आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार रोनाल्डोनं विराटच्या सगळ्या कारच्या किंमतीपेक्षा जास्त असलेली एक कार खरेदी केली आहे. रोनाल्डो हा पोर्तुगालच्या फुटबॉल संघातील प्रसिद्ध खेळाडू आहे. त्याचबरोबर तो जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळाडू देखील आहे.

रोनाल्डो याला स्पोर्ट्स कार आणि आलिशान गाड्यांची फार आवड आहे, हे त्याने नुकत्याच घेतलेल्या एका महागड्या गाडीमुळे सिद्ध झाले आहे . त्याने नुकतीच एक ६.६ कोटी किमतींची मॅकलेरन सेना सुपरकार खरेदी केली आहे. ही कार ब्राझीलचा फॉर्म्युला वन रेसर एर्यटन सेना याच्या नावावर आहे. विराट कोहलीचे या सगळ्यात नाव येण्यास कारण म्हणजे विराट कोहलीकडे असणाऱ्या सगळ्या गाड्यांची किंमत हि १० कोटींच्या घरात आहे. आलिशान गाड्यांची आवड असणाऱ्या रोनाल्डोकडे आतापर्यंत १९ गाड्या आहेत. त्याच्याकडील सर्वात महागडी गाडी आहे बुगाती वेयरॉन. त्या गाडीची किंमत ११ कोटी रुपये आहे.

दरम्यान, या गाड्यांशिवाय रोनाल्डोकडे लम्बरगिनी, बीएमडब्ल्यू, बेंटले, मर्सिडीज पोर्शे आणि फरारी अशा महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे ऑडीचे चार लक्झरी मॉडेल आहेत. विराट या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे.