सौदी अरेबियामध्ये एक मोठा शोध ! आढळल्या 1,20,000 वर्ष जुन्या मानवाच्या पायांच्या खुणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियामधील एका तलावाजवळ सुमारे एक लाख २० हजार वर्ष जुन्या मानवाचे आणि काही मोठ्या प्राण्यांचे ठसे सापडले आहेत. असे मानले जात आहे की, होमो सेपियन्सचा एक गट अन्न आणि पाण्याच्या शोधात तेथे थांबला होता. उंट, म्हशी, हत्ती यासारखे मोठे प्राणीही या तलावावर पाणी पिण्यासाठी आले असावेत, कारण त्यांच्याही पायांचे ठसे सापडले आहेत.

संशोधकांचा असा विश्वास आहे की, या मानवांनी काही मोठ्या सस्तन प्राण्यांची शिकार केली असावी. ते येथे बराच काळ थांबले नसतील, उलट या जागेचा वापर पाणी पिण्याची जागा म्हणून करत असतील आणि नंतर त्यांच्या लांबच्या प्रवासाला जात असतील.

मानवाच्या पूर्वजांचा इतिहास शोधला जाऊ शकतो
सायन्स अ‍ॅडव्हान्समध्ये बुधवारी प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात संशोधकांनी असा दावा केला आहे की, सौदी अरेबियाच्या नेफुड वाळवंटात (Nefud Desert) सापडलेल्या मानवी पायाच्या या ठशांमुळे समजू शकते की मानवांचे पूर्वज आफ्रिकेहून जगातील इतर भागात कोणत्या मार्गाने पसरले होते.

हा वाळवंट एक कोरडा वाळवंट असावा, जिथे मानवांना आणि प्राण्यांना राहण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाले नसेल, पण मागील १० वर्षांच्या अभ्यासानुसार समजते की, असे वातावरण नेहमीच नसेल आणि हवामानातील बदलांमुळे हे क्षेत्र अधिक हिरवेगार आणि ओलसर झाले आहे आणि आता या ठिकाणी हिरवे गवताळ मैदान आणि ताज्या पाण्याच्या नद्या आणि तलाव आहेत.

२०१७ मध्ये मिळाले होते पायांचे ठसे
जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिकल इकोलॉजीच्या पेपरचे पहिले लेखक मॅथ्यू स्टीवर्ट म्हणाले की, मानवाच्या पायांचे हे ठसे २०१३ मध्ये अलाथार तलावाजवळ सापडले होते. पायांच्या या ठशांवरून हे दिसून येते की, मानव जगभर कसे पसरले. सापडलेल्या शेकडो ठशांपैकी सात पदचिन्ह होमिनिनचे (आधुनिक मानव, नामशेष झालेल्या मानव प्रजाती आणि त्यांचे सर्व पूर्वज) आहेत, ज्यावरून असे सूचित होते की सुमारे चार लोकांचा समूह प्रवास करत असावा.

संशोधकांचा असा विश्वास आहे की, ते आधुनिक मनुष्यांसारखे होते. त्यावेळी काही मोठे प्राणी देखील तेथे उपस्थित होते, पण दगडांची कोणतीही हत्यारे येथे सापडली नाहीत, जेणेकरून असे म्हणता येईल की हे मानव येथे शिकार करण्यासाठी नाही, तर पाण्यासाठी येत होते, परंतु त्यांनी प्राण्यांचीही शिकार केली असावी.

या जागेकडे का आले असतील मनुष्य
पायांच्या ठशांव्यतिरिक्त येथे २३३ जीवाश्म देखील सापडले आहेत. मॅक्स प्लँक या अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक मायकेल पेट्रागलिया म्हणतात की, मोकळ्या गवताळ प्रदेश आणि मोठ्या जलसंपदामुळे हत्ती आणि हिप्पोसारख्या मोठ्या प्राण्यांच्या उपलब्धतेमुळे आफ्रिका आणि युरेशियामध्ये फिरणाऱ्या मानवांना उत्तर अरबच्या दिशेने खासकरून आकर्षित केले असेल. सौदी हेरिटेज कमिशनचे म्हणणे आहे की, हा शोध अरबमधील मानवी जीवनाच्या सर्वात प्राचीन अस्तित्वाचा पहिला वैज्ञानिक पुरावा असू शकतो.