तब्बल १३०० वर्षांपासून ‘या’ लोकांनी टाकले नाही जमिनीवर ‘पाऊल’ ; कारण वाचून ‘थक्क’ व्हाल

बिजिंग : वृत्तसंस्था – साधारणपणे माणसे जमिनीवर घर बांधून रहाणे पसंत करतात. परंतु अनेकांना माहिती नसेल असेही काही लोक आहेत ज्यांनी १३०० वर्षांपासून जमिनीवर पायच ठेवलेला नाही. यामागील कारणही तुम्हाल हैराण करणारे आहे. टांका नावाची ही जमात आहे. चीनमध्ये निवास करणारी ही जमात असून येथील लोक जमिनीवर नाही तर समुद्रात रहाणं पसंत करतात. यांचं पूर्ण जग पाण्यातच आहे.

Tanka Domicile

टांका जमातीच्या तब्बल ७००० लोकांनी समुद्रावर तरंगणारं गाव वसवलं आहे. चीनच्या दक्षिण पूर्व भागात ७००० मच्छिमारांचे परिवार आपल्या पारंपरिक नावा असलेल्या घरात रहात आहेत. ही घरं म्हणजेच नावा असून ही घरं पाण्यावर तरंगत आहेत. या घरांची अख्खी वस्तीच आहे. समुद्री मच्छिमारांची ही पूर्ण वस्ती फुजियन राज्यातील दक्षिण पूर्वमधील निंगडे सिटीजवळ समुद्रात तरंगत आहे. या लोकांना ‘जिप्सीज ऑफ द सीज’ म्हणूनही संबोधलं जातं. चीनमध्ये इसवी सन ७०० मध्ये तांग राजवंशाचे शासन होते. तेव्हा युद्धापासून बचाव करण्यासाठी टांका जमात समुद्रात नावांमध्ये राहू लागली. तेव्हापासूनच त्यांना जिप्सीज ऑफ द सीज म्हटलं जाऊ लागलं.

या लोकांनी क्वचितच कधी जमिनीवर पाऊल टाकले असेल. असे महटले जात आहे की, टांका जमातीतील लोक तेथील शासकांकडून होणाऱ्या त्रासामुळे वैतागले होते आणि नाराज होऊन त्यांनी समुद्रात राहण्याचा निर्णय घेतला. इसवी सन ७०० पासून हे लोक समुद्रात रहात आहेत. टांका जमातीतील लोकांचं पूर्ण आयुष्य पाण्यातील घरात आणि मासेमारी करण्यात जातं. चीनमध्ये कम्युनिस्ट शासनाची स्थापना होईपर्यंत हे लोकं कधीच किनाऱ्यावर आले नाहीत आणि त्यांनी कधी समुद्राच्या किनाऱ्यावरील लोकांसोबत लग्नाचेही संबंध बनवले नाहीत. यांच्यातील लग्नही नावांवरच पार पडतं.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

मोदी सरकारला धक्का, बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर

 

You might also like