30 वर्ष विरोधक असलेल्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्यात अनेक चमत्कारपूर्वक घटना घडल्या. रात्रीत स्थापन झालेले सरकार दोन दिवसात कोसळलं. जेवढ्या घाईने फडणवीस यांनी सरकार स्थापन केले तेवढ्या घाई घाईत हे सरकार कोसळलं. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज झालेल्या हॉटेल ट्रायडंटमधील महाविकासआघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली.

त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या राजकीय विरोधकांचा 30 वर्ष सामना केला आज त्यांनीच माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवला परंतू 30 वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की तीन वेगवेगळ्या पक्षांचे म्हणून हामरीतुमरी करायचे नाही. मला माहित आहे मुख्यमंत्री पदाची खुर्ची कशी असते. त्याला बरोबर काटे, खिळे असतात. जाणारा मुख्यमंत्री आणखी दोन तीन खिळे लावून जातो. तुम्ही कितीही खिळे ठोका, माझ्याकडे हातोडा आहे. सर्व खिळे खूर्चीला नीट ठोकेल. सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या भावाला भेटायला दिल्लीला जाणार अशी कोपरखळी देखील उद्धव ठाकरे फडणवीसांना मारायला विसरले नाहीत.

महाविकासआघाडीच्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळाली आहे. 1 डिसेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ ग्रहण करतील.

Visit : Policenama.com