#Yoga Day 2019 : दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येकाला वाटते की, आपण खूप काळ जगावे त्यासाठी व्यक्ती दिर्घ आयुष्य जगण्यासाठी व्यायाम, योगा नियमित करत असतो पण हे करताना आपल्याला लक्षात आहे का ? की, दीर्घ आयुष्य जगण्यासाठी आपला श्वास महत्वाचा आहे. तो श्वासच नसेल तर आपण व्यायम व योगा करु शकतो का ? आपल्या जीवनामध्ये श्वासाला खूप महत्व आहे. श्वासाचे प्रकार वेगळे आहे. म्हणजे आपण श्वास घेतो त्याला पूरक आणि श्वास सोडत त्याला रेचक व रोखून ठेवतो त्याला कुंभक असे म्हटले जाते. माणसापासून ते प्राण्यांपर्यंत प्रत्येकाच्या श्वासाल महत्व आहे. संशोधकांनी याचा अभ्यास केला असता काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्या कोणत्या ? हे आपण सविस्तर जाणून घेऊया..

प्रत्येक व्यक्ती खूप काळ जगण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. यामध्ये व्यायाम, योगा, जेवणामध्ये पत्थे किंवा जे शरीराला घातक आहे त्यापासून दूर राहत असतात. ते केवळ आपले आयुष्य चांगले आणि दीर्घकाळ जगण्यासाठी. आपल्या या आयुष्यात श्वासाला खूप महत्व आहे. ते नसेल तर माणूस जगू शकत नाही. त्यामुळे आपण नियमित आपली काळजी घेतली पाहिजे. व्यायाम योगा केला पाहीजे. दीर्घ आयुष्य जगण्यासाठी योगा करणे खूप गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे योगविद्येत यांनी म्हटले आहे.

याबाबतीत संशोधकांनी जास्त काळ जगणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करुन त्यांच्या असे लक्षात आले की, हळू श्वास घेणारे प्राणी दीर्ध आयु्ष्य जगतात. प्राण्यांमध्ये पहिला म्हणजे कासव जो की, सात मिनिटातून एक श्वास घेतो. कासव ३०० वर्षे जगतो. दुसरा म्हणजे कुत्रा खूप वेगाने श्वास घेतो आणि तो फक्त तेरा किंव्हा चौदा वर्षेच जगतो. यावरुन तुम्ही लक्षात घ्या की, आपल्या श्वासाला किती महत्व आहे. आपल्या श्वासावर खूप गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही नियमित योगाभ्यास आणि प्राणायम केले तर यामुळे श्वास घेण्याची गती हळूहळू कमी होते. त्यामुळे आपण दीर्घ श्वास घ्यायला शिकतो.

पुर्वी ऋषी मुनी अधिक वर्षे जगत होते. तुम्हाला जर दिर्घ आयु्ष्य जगायचे असेल तर, नियमित योगासने व प्राणायम करा. ‘प्राण’ म्हणजे वैश्विक जीवन शक्ती होय. तर ‘आयाम’ म्हणजे तिला नियंत्रित करणे. दीर्घ करणे. आपल्या शारीरिक आणि सुक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्व आहे. जिच्याशिवाय आपले शरीर नष्ट पावू शकते. जिच्यामुळे आपण जिवंत आहोत. श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्राणायम. या प्रक्रिया नासिंकावर श्वास घेण्यावर अवलंबून असते. त्यामुळे योगा आणि प्राणायम आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी ” डोळ्याची ” काळजी

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

सिने जगत

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

‘या’ अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला अटकेत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like