भाजपासाठी 10 लाख फॉलोवर्सचा केला ‘त्याग’ ; अभिनेत्री हेमा मालिनी बनल्या चौकीदार हेमा मालिनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपातील उमेदवार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विटरवरील 10 लाख फॉलोवर्सचा भाजपासाठी त्याग केला आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या 10 लाख फॉलोवर्स असणाऱ्या ट्विटर अकाऊंटरील नावात बदल केलेला नाही.

https://twitter.com/HemaMaliniMP/status/1114055439795277824

त्यांनी भाजपाच्या मै भी या चौकीदार मोहिमेसाठी जुन्या नावात बदल न करता थेट नवीन ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. जुलै 2011 पासून असलेले आपले ट्विटर अकाऊंट आणि 10 लाख फॉलोवर्स यांचा हेमा मालिनी यांनी त्याग केला आहे.हेमा मालिनी यांनी आपल्या जुन्या अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे आणि आपल्या नव्या ट्विटर अकाऊंटबद्दल माहिती दिली आहे. शिवाय जे माझ्या राजकीय प्रवासात माझ्यासोबत आहेत आणि ज्यांच्या मला शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठी मी माझं नवीन ट्विटर अकाऊंट सुरु करत आहे, तिथेही तुम्ही मला फॉलो करा असे आवाहन हेमा मालिनी यांनी केले आहे.

आपल्या राजकीय प्रवासासाठी सुरु केलेल्या चौकीदार हेमा मालिनी या नवीन अकाऊंटविषयी आपल्या चाहत्यांना माहिती देताना केलेल्या ट्विटमध्ये हेमा मालिनी म्हणतात की, “माझ्या ट्विटरवरील सर्व फॉलोवर्ससाठी ज्यांना माझ्या राजकीय प्रवासात स्वारस्य आहे आणि जे माझ्या या राजकीय प्रवासात माझ्या सोबत आहेत, जे मला नेहमी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात, अशा सर्वांसाठी मी आणखी एख दुसरं ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवर माझ्या सर्व राजकीय घडामोडींची माहिती असणार आहे. प्लिज मला @HemaMaliniMP (Chowkidar Hema Malini) या अकाऊंटवरही फॉलो करा आणि कमेंट्सही करा.” असे आवाहन हेमा मालिनी यांनी केले आहे.

भाजपासाठी आणि आपल्या पुढील राजकीय प्रवासासाठी हेमा मालिनी यांनी मै भी चौकीदार या मोहिमेअंतर्गत चौकीदार हेमा मालिनी असे नवे अकाऊंट सुरु केले आहे. आपल्या 8 वर्ष जुन्या ट्विटर अकाऊंटचा आणि 10 लाख फॉलोवर्सचा त्यांनी भाजपासाठी त्याग केला आहे. चौकीदार हेमा मालिनी या त्यांच्या नव्या अकाऊंटवर हेमा मालिनी यांचे एकूण 3,876 फॉवोवर्स आहेत तर 7 जणांना त्या स्वत: फॉलो करत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, बीजेपी आणि त्यांच्या जुन्या अकाऊंटचाही समावेश आहे.